आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक संभ्रमात : नर्सरी, केजीच्या प्रवेशाचे शुल्क धोरण अनिश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नर्सरी केजीचे प्रवेश अनेक शाळांमध्ये सुरू झाले आहेत. आपल्या मुलांना चांगल्या नामांकित शाळांमध्ये टाकण्याची धडपड पालकांनी सुरू केली अाहे. मात्र, शाळांचे शुल्क हे आवाक्याबाहेर असल्यामुळे अनेक पालक संभ्रमात पडले असून, या शाळांनी किती शुल्क घ्यावे, यासाठी कुठलेही धाेरण नसल्यामुळे मागेल तेवढे शुल्क देऊन प्रवेश घेण्याची वेळ पालकांवर आली आहे.
शहरातील नामांकित शाळांमध्ये १० ते ३० हजार रुपये वार्षिक शुल्क आकारल्या जात असून, त्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ केल्या जाते. मात्र, नर्सरी केजीच्या प्रवेश शुल्कावर कोणताही अंकुश नसल्यामुळे दरवर्षी प्रवेश शुल्कात वाढ हाेत आहे. घरातील लहान मूल दोन-सव्वादोन वर्षांचे झाले की, पालकांना नामांकित शाळेत आपल्या चिमुकल्याला प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता लागणे सुरू होते. नेमकी हीच बाब हेरून अवास्तव फी आकारणाऱ्या नर्सरीचे पेव फुटले आहे. जितकी जास्त फी तितके दर्जेदार शिक्षण, असे बिंबवले जात आहे. अकोला शहरात विविध माध्यमांच्या सुमारे २०० प्राथमिक शाळा आहेत. यातील ५० पेक्षा जास्त शाळा इंग्रजी माध्यमांच्या आहेत. काही शाळांतील प्रवेश प्रक्रिया नर्सरीतून आलेल्या विद्यार्थ्यांमधून होते. काही इंग्रजी शाळांनी नर्सरीसाठी शिक्षण फी निश्चित केली आहे.
याव्यतिरिक्त ड्रेस, स्टेशनरी, बॅग, येणे-जाणे, विविध उपक्रम यांच्यासाठी अतिरिक्त खर्च जो वार्षिक दहा ते पंधरा हजार रुपये म्हणजे एकूण ३० ते ४५ हजार रुपये एका वर्षासाठी आहे. पालकांनी पाल्याच्या शिक्षणाचा स्वार्थ बाजूला ठेवून पैसे उकळणाऱ्या संस्थाचालकांविरोधात समोर येणे गरजेचे आहे.
शुल्कासंबंधीचेअधिकार नाहीत शिक्षण विभागाला : जिल्ह्यातसामान्यत: किती नर्सरी आहेत, त्यातील विद्यार्थी संख्या किती, फी किती, याबद्दलची सर्व माहिती कायम गुलदस्त्यात असते. नर्सरी प्रवेशासाठी पालकांची धावपळ असते ती सुनिश्चित भवितव्याच्या दृष्टीने. पाल्याचे भवितव्य सर्वच पालकांसाठी महत्त्वाचे असते. याचाच फायदा घेत अवास्तव फी आकारली जाते. मात्र, नर्सरी, केजीसाठी शुल्क काय असावे, यात शिक्षण विभाग हस्तक्षेप करत नाही.

प्रवेश व्हावेत ऑनलाइन : पुणे,मुंबईमध्ये नर्सरी, केजी पहिलीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यामुळे शिक्षण शुल्कामध्ये काही अंशी पारदर्शीपणा राहतो. मात्र, आपल्याकडे संस्थाचालकांच्या मर्जीनुसार प्रवेश होतात. परिणामी हव्या त्या शिक्षण संस्थेत प्रवेश पालकांना मिळवता येत नाही. त्यासाठी नर्सरी केजीच्या प्रवेशासाठी प्रवेश शुल्काबाबत निश्चित धोरण असणे गरजेचे आहे.

जास्त शुल्क घेणाऱ्यांच्या तक्रारी करा

^शिक्षण स्था जर नर्सरी, केजी पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी भरमसाट प्रवेश शुल्क घेत असतील, तर पालकांनी तक्रार करावी. या वेळी मी प्रवेश शुल्क निश्चितीसंदर्भात लवकरच बैठक घेणार आहे. २५ टक्के प्रवेशाचे धोरण निश्चित आहे. मात्र, नर्सरी केजीच्या प्रवेशासाठी प्रवेश शुल्कासंदर्भात सरकारचे निश्चित धोरण नाही. मात्र, कारवाई करण्याचे अधिकार आहेत. प्रफुल्लकचवे, शिक्षणाधिकारी प्राथमिक

शुल्क नियंत्रणासाठी पालकांचा पुढाकार हवा

शासनाने सर्व नर्सरी शाळेची नोंद घेऊन त्यांना नियमांच्या वर्तुळात आणणे गरजेचे आहे. मात्र, विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधून नर्सरी केजीचे शिक्षण देण्यात येत असल्यामुळे त्यांचा खर्च ते कसा करणार, या हेतूने जर सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर अशा शुल्कवाढीवर नियंत्रण कसे आणणार, हा प्रश्न आहे. शुल्क नियंत्रणासाठी सरकारवर दबाव आणायचा असेल तर पालकांनाच पुढाकार घ्यावा लागेल.

महत्त्वाचे आक्षेप

{अशाशाळेमध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही.
{संबंधित शाळांतील शिक्षकांना शैक्षणिक पात्रता लागू होत नाही.
{प्रि-प्रायमरी शिक्षणाकरिता अवाढव्य फी आकारली जाते.
{एलकेजी प्रवेशावेळी पुन्हा वेगळे डोनेशन अाकारले जाते.
{नर्सरी शाळांबाबतीत तक्रारींकडे शिक्षण खाते दुर्लक्ष करते.

प्रवेश नावाजलेल्या शाळेत सेटिंग करून होतात

शहरांमध्येकाही शाळा या नावाजलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये सहजासहजी प्रवेश होत नाहीत. रक्ताच्या नात्यांना प्रथम संधीच्या नावाखाली प्रवेशाच्या जागा रिक्त ठेवण्यात येतात. नंतर याच शाळांमध्ये प्रवेशासाठी सेटिंग करून प्रवेश होतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये सर्वसामान्यांचे मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत.

वार्षिक शुल्कातदरवर्षी वाढ केल्या जाते. 10%शहरातील नामांकित शाळांमध्येवार्षिक शुल्क आकारल्या जात असून १० ते ३० हजार रुपये