आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ बालिकेची देखरेख न करणाऱ्या परिचारिकेची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चारदिवसांपूर्वी एका स्त्रीने मुलीला जन्म देऊन रस्त्यावर फेकले होते. त्या मुलीला मुंग्या लागल्या होत्या. मात्र, एका सहृदयी व्यक्तीने मुलीला सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल केले होते. रुग्णालयात या बेवारस मुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या परिचारिकेची बदली करण्यात आली आहे. आता विशेष डॉक्टरांच्या निगराणीत या मुलीवर उपचार सुरू आहे.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशाताई मिरगे सोमवारी या मुलीची भेट घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांनी मुलीचे वैद्यकीय अहवाल तपासले आणि डॉक्टरांना सूचना केल्या. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासोबत त्यांनी चर्चा करून मुलीच्या उपचाराबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत असतानाही त्या मुलीजवळ मुंग्या कशा गेल्या, याबाबत विचारणा केली. त्यावर अधिष्ठाता राठोड यांनी ड्युटीवर असलेल्या परिचारिकेची त्या वाॅर्डातून तत्काळ बदली करण्याचे आश्वासन देत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुलीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे

आम्हीमुलीकडे विशेष लक्ष देत आहोत. ‘दिव्य मराठी’मधून मला या प्रकाराबाबत कळले. त्या दिवशी कोण ड्युटीवर होते, यासंदर्भात चौकशी केली असून, संबंधित परिचारिकेची बदली केली आहे. इमारत फार जुनी असल्यामुळे कुठून मुंग्या येतील सांगता येत नाही. अशा अवस्थेतही रुग्णालय प्रशासन चांगले काम करत आहे.'' डॉ.अशोक राठोड, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.