आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळसपणे करा मतदान- प्रा.विशाल कोरडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-समाजात चांगला बदल घडावा, यासाठी आम्ही अंध असूनही प्रज्ञाचक्षुचा वापर करून मतदान करतो.सुराज्य स्थापन व्हावे, यासाठी सर्वांनीच डोळसपणे मतदान करावे, असे आवाहन नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड सोसायटीचे संचालक प्रा. विशाल कोरडे यांनी केले.
बुधवार, 15 ऑक्टोबर महाराष्ट्राचं भवितव्य घडवणाऱ्या मतदारांचा दिवस. योगायोगाने याच दिवशी जागतिक अंध दिनही आलाय. यानिमित्ताने प्रा. िवशाल कोरडे यांनी "दिव्य मराठी'शी दिलखुलास संवाद साधला. सशक्त लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. राशनपासून तर संरक्षणापर्यंतची जबाबदारी सरकारची आहे, असे आपण म्हणतो. सरकारकडून तशी अपेक्षाही ठेवतो. मग, त्याच सरकारला निवडण्यासाठी बरेच नागरिक मागे हटताना दिसतात. आपल्या एका मताने थोडेच उमेदवारांचे भवितव्य ठरू शकते, असा भ्रम मनात ठेवून एक एक करता असे हजारो मतदार मतदानाच्या पवित्र कार्यापासून वंचित राहत असल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार निवडून येणे कठीण होऊन बसले आहे.
आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत की, मग आपोआपच आपल्याला बोगस उमेदवार निवडून आल्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे योग्य उमेदवार निवडीची आजच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदान केल्याशिवाय राहू नका. आपल्या एका मताने आपण संिवधानाचा सन्मान तर राखतच आहोत, शिवाय लोकशाहीची प्रतिष्ठासुद्धा वाढवत आहोत, हे विसरून चालणार नाही. आम्ही अंध असूनसुद्धा विचारपूर्वक मतदान करतो. अशाचप्रकारे सामान्य मतदारांनीसुद्धा डोळसपणे मतदान करावे.15 ऑक्टोबर रोजी कोणत्याही आमिषाला बळी पडता मतदान करा, असा सल्ला प्रा. कोरडे यांनी दिला आहे.
मतदानकेंद्रांवर होते गैरसोय
अनेकमतदान केंद्रांवर अंध मतदारांची गैरसोय होते. ब्रेल लिपी सहा छिद्राची असते. एक मतदान पत्रिका दोनपेक्षा अधिक मतदारांना दिल्यास त्यावरील छिद्रे पुसून जातात. त्यामुळे ओळखताना अडचण निर्माण होते. त्यामुळे एकाला एकच ब्रेल लिपी असलेली मतपत्रिका द्यावी. बऱ्याच मतदान केंद्रांवर अर्ज भरून घेतला जात नाही. आम्ही अर्ज भरून घेऊ, असे मतदान अधिकारी सांगतात. मतदान अधिकाऱ्याने आपली जबाबदारी चोख पार पाडावी.
योग्य उमेदवार निवडा
केवळमतदानाच्या आदल्या दिवशी घरी येऊन मतदानासाठी भीक मागणाऱ्या उमेदवारांची निवड करू नका. मतदारसंघाची जाण असलेला, योग्य पद्धतीने काम करू शकणारा, पक्षीय राजकारण बाजूला सारून समाजकारण करणारा, विकासाची कास धरणाऱ्या उमेदवाराची आपला आमदार म्हणून निवड करा. प्रा.विशाल कोरडे, संचालक,नॅब संघटना