आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापडापासून तयार होतो कागद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कापडापासून कागदनिर्मितीची कला मुळात चीनमध्ये विकसित झाली. मोगल काळात ती भारतात आली. शाह बेग यांनी चीनमध्ये ही कला अवगत करून देशात विकसित केली. बेग यांचे राजस्थानमधील चित्तोडगड येथील वंशज मिर्झा अकबर बेग कागझी सध्या राष्ट्रीय लोककला महोत्सवानिमित्त अमरावतीत आहेत. या महोत्सवात बेग ही कला शालेय िवद्यार्थ्यांना नि:शुल्क शिकवणार आहेत. विशेष म्हणजे हा कागद ५०० वर्षे टिकू शकतो, असा बेग यांचा दावा आहे.
इतिहाdivस: गेल्या६० वर्षांपासून बांबू, गवत, झाडपाला याचा वापर करून मशीनद्वारे कागदाची िनर्मिती होते. त्याआधी सन १४०० पासून देशात कापडापासून हाताने कागद तयार केला जात होता. त्यावरच धार्मिक ग्रंथ, नोंदी केल्या जात. िमर्झा अकबर बेग कागझी यांनी रेशमी कापड, सुती कापड, बनियन्स, होजियरी यांपासून विविध रंगांच्या टिकाऊ कागदाच्या िनर्मितीचा वसा जोपासला आहे. बेग गेल्या ४० वर्षांपासून ही कला शिकवतात. त्यांनी वेगवेगळे रंग, आकार आणि जाडीचे कागद, अल्बम, पुस्तके आणि वह्या तयार केल्या आहेत. िवशेष म्हणजे या पुस्तकांना चामड्याचे नक्षिकाम केलेले कव्हरही ते स्वत: हाताने तयार करतात.
निसर्गाला जपा...
सध्यामशीनद्वारे तयार केलेला कागद फार तर २०-२५ वर्षे टिकू शकतो. शिवाय िनसर्गाचेही अतोनात नुकसान होते. बांबूची वने कापली जातात, झाडांची कत्तल होते. ही प्रक्रिया किचकट, वेळखाऊ, प्रदूषण निर्माण करणारी खर्चिक अाहे. याउलट हँडमेड पेपर स्वस्त टिकाऊ असतो. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होत नाही, असे बेग सांगतात.

असा तयार होतो कागद जुन्याबनियन्स िकंवा सुती कापडाचा लगदा केला जातो. हौदात िकंवा टाकीत पाणी घेऊन त्यात हा लगदा मिसळल्यावर जाळी बसवलेली चौकट िकंवा पारंपरिक गवताच्या काड्यांपासून तयार जाळी फिरवली जाते. या जाळीवर थर जमतो. ही जाळी उन्हात वाळत ठेवायची. झाला कागद तयार.