आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Pulse Polio Immunization Campaign Issue At Akola

घरोघरी जाऊन चिमुकल्यांना पाजणार पोलिओ डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा 19 जानेवारीला झाल्यानंतर आता आरोग्य विभागातर्फे ‘घरोघरी’ अभियान राबवण्यात येत आहे. 21 ते 25 जानेवारी असे पाच दिवस प्रत्येक घरी जाऊन शून्य ते पाच वष्रे वयोगटातील बाळाला पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी याबाबत कृती आराखडा तयार केला असून, आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

अकोट, तेल्हारा, बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय व पातूर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणार्‍या नागरी भागात 45 हजार 477 घरे मोहिमेंतर्गत पोलिओ डोस पाजण्यासाठी प्रस्तावित आहेत. या घरांमधील शून्य ते पाच वष्रे वयोगटांतील प्रत्येक बाळाला पोलिओ डोस पाजण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचार्‍यांवर सोपवली आहे. यासाठी पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार हजार 420 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य संस्था बालकांची संख्या
अकोट 1732
तेल्हारा 318
मूर्तिजापूर 975
बाळापूर 828
पातूर 567
एकूण 4420

लसीकरणाचे उद्दिष्ट
एकही बाळ पोलिओ डोस पाजण्यापासून वंचित राहू नये, याची काळजी पालकांसह संबंधित कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍याने घ्यावी. नागरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांची माहिती गोळा करून त्यावर अंमलबजावणी सुरू आहे.’’ डॉ. आर. एच. गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.