आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी जाऊन बाळांना पल्स पोलिओ डोस देणार, जिल्ह्यात आजपासून राबवणार मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम कार्यक्रमांतर्गत मंगळवार, २० जानेवारीपासून आयपीपीआयअंतर्गत घरोेघरी जाऊन बाळांना पल्स पोलिओ डोस पाजण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे.

१८ जानेवारी रोजी राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ७९ टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संपूर्ण आठवडा पोलिओ आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत २० जानेवारीपासून घरोघरी जाऊन ते वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येईल. रोगप्रतिबंधक पोलिओ लस प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला पाजण्याची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

इतर घटकांचाही सहभाग
पल्सपोलिओ मोहिमेत आरोग्य खात्याशिवाय शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी कार्यकर्ता यांचे सहकार्य लाभत आहे. रविवारप्रमाणेच आयपीपीआय पल्स पोलिओ मोहीमसुद्धा यशस्वीपणे राबवण्याचे ध्येय आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे.

बाळाला डोस नक्की पाजा
-यामोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी वाॅर्डातील प्रत्येक घरी जाऊन बाळाला पोलिओ डोस दिला की नाही, याची खात्री करतील.'' डॉ.रामचंद्र गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.