आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Youth Congress 'siiom' S Room, Squat Down

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ‘सीईओं’च्या कक्षात ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-जिल्हा परिषदेंतर्गत येणारे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी मुख्यालयातच राहावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या कक्षात मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना मुख्यालयात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अकोला जिल्हा परिषदअंतर्गत येणार्‍या आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर्स, नर्स, आशा, अंगणवाडी सेविका, पशुवैद्यकीय कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी मनोज ताथोड, विकास सदाशिव, महेश सरप, सागर देशमुख, संतोष चोंडके, बाळासाहेब तायडे आदींसह मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी काढले आदेश

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत शासनाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार अवगत करण्यात आले आहे. याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच, मुख्यालयी उपस्थित न राहणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित जिल्हा परिषदेच्या संबंधित खाते प्रमुख, पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या नावे काढले आहे.