आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदय विद्यालयातील विनयभंग प्रकरणी मुलींची चौकशी सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयातील विनयभंगप्रकरणी सातव्या दिवशीही मुलींची उलटतपासणी सुरू होती. विद्यालयातील सर्व मुलींचे बयाण घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. तीन-तीन समित्या चौकशी करत असून, वस्तुस्थितीबाबत मात्र, संभ्रम निर्माण झाला आहे. "दिव्य मराठी'कडे जवाहर नवोदय विद्यालयाशी जुळलेल्या अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून, तेथील शिक्षकांच्या अंतर्गत राजकारणांवर आपले मत व्यक्त केले.

३१ मार्च रोजी जवाहर नवोदय विद्यालयातील काही पालकांनी तेथील दोन शिक्षकांविरुद्ध अभद्र व्यवहाराचे आरोप केले होते. मात्र, त्यांच्या तक्रारीवरून नव्हे, तर प्राचार्याच्या तक्रारीवरून शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके यांच्याविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर तिस-या दिवशी तिसरा शिक्षक संदीप लाडखेडच्या विरुद्ध बालकल्याण समितीच्या सदस्या संगीता भाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. तिन्ही शिक्षक पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय स्तरावरून घेतल्याने सर्वच यंत्रणांनी तपास सुरू केले आहेत. बालकल्याण समिती, पोलिसांची महिला अधिका-यांची समिती आणि जवाहर नवोदय विद्यालयातील सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समिती सात दिवसांपासून मुलींची चौकशी करत आहे. मुलींची चौकशी महिला अधिका-यांकडून होणे अपेक्षित असताना खुद्द खासदार संजय धोत्रे यांनीही या मुलींची चौकशी केली आहे.