आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navoday Vidyalay Girls Rape Case Issue Court Refused Bail Application

नवोदय विद्यालय लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांचा जामीन अर्ज फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लैंगिक छळाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले बाभुळगाव जहाँगीर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोघांचा जामीन अर्ज पॉस्कोच्या विशेष न्यायालयाने फेटाळला.
रामटेके आणि गजभिये या दोघांनी आपला लैंगिक छळ केला, असा आरोप विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींनी केला. त्याआधारे पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना नागपूर येथून अटक केली. त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आपल्याला जामीन द्यावा, असा अर्ज या दोघांनी पॉस्कोच्या विशेष न्यायालयाकडे केला होता. न्यायामूर्ती व्ही. एन. तांबी यांनी दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तो फेटाळला.