आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नझूल कार्यालय लोकाभिमुख होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शेगाव येथील नझूल कार्यालय.)
शेगाव - नझूल कार्यालयात येणा-या नागरिकांची नझूल कार्यालयात तातडीने कामे व्हावीत या उद्देशाने हे कार्यालय लोकाभिमुख करण्यात येणार आहे. या कार्यालयातून नागरिकांना मिळकत प्रमाणपत्र लवकरच संगणकीकृत देण्याच्या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे.
मिळकत प्रमाणपत्र, प्लॉट शेतीचे मोजमापाची कामे स्थावर संपत्तीबाबतची कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांना वारंवार नझूल विभागाशी काम पडते. येथील नझूल कार्यालयात या ठिकाणी एक अधिकारी ३० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील वर्ग तीनचे एक आणि अधिका-याचे एक पद रिक्त आहे. शेगाव कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण शहरातील नागरिकांच्या स्थावर मालमत्तेची माहिती आहे. तसेच शेगाव विकास आराखडा आणि आणि जिगाव प्रकल्पाबाबतच्या कामाची अतिरिक्त जबाबदारी या कार्यालयावर आहे. या कार्यालयात नझुल रेकार्डचे संगणकीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर २०१६ पासूनची ऑनलाईन नक्कल पाहता येणार आहे. तसेच मालमत्ताधारकांना मिळकत प्रमाणपत्र त्वरीत मिळणार आहे. या कार्यालयात सद्य:स्थितीत कागदपत्रांच्या डाटा एन्ट्रीचे काम सुरू आहे. प्रापर्टी कार्डही संगणकीकृत होणार आहे.

सातबारा देणे बंद
शेतीअकृषक करता गुंठेवारीत शहरातील अनेकांनी प्लॉट विकत घेतल्यानंतर त्या प्लॉटवर घर बांधले आहे. जिल्हाधिका-यांकडून संबंधित जागेचे सातबारा देणे बंद झाले आहे. तर नझुलकडूनही मिळकत प्रमाणपत्र देणे बंद झाले आहे.

सामूहिक अर्ज करून जागा अकृषक करावी
अकृषकअसलेल्या भागातील प्लॉटधारकांनी सामूहिक अर्ज केल्यानंतर संबंधित भाग अकृषक करून मोजणीचे पैसे नझूल कार्यालयात भरल्यानंतर नोंद घेण्यात येणार आहे. अकृषक जागांचे स्थळ निरीक्षण करण्यात येणार आहे.