आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर कारमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युगुलास पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सिटीकोतवाली पोलिस ठाण्याच्या पाठीमागे एका भोजनालयाच्या समोर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत होते. संशयावरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यांना हे कृत्य आढळून आले. या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आम्ही नातेवाईक असून, गप्पा मारत असल्याचा त्यांनी बनाव करण्याचा प्रयत्न केला.
बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याचा मुलगा धुळे येथे एमबीबीएसचे शिक्षण घेतो. तो सुटीवर आल्यानंतर त्याची प्रेयसी त्याला भेटली. ती २४ वर्षांची असून, कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. हे दोघे संध्याकाळी एका कारमध्ये बसले. सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या एका भोजनालयासमोर कार उभी केली. कारमध्येच त्यांनी सर्वकाही विसरून अश्लील वर्तन केले. कारला काळ्या काचा असल्यामुळे आणि बऱ्याच वेळापासून कार उभी असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कारची चौकशी केली, त्यांनी दोघांनाही अश्लील वर्तन करताना रंगेहात पकडले.
चोरी पकडली म्हणून दोघेही गांगरून गेले. नातेवाईक आहोत, आमचे असे काही नाही, आम्ही नेत्यांची मुले आहोत, असा परिचय सिला. मात्र, पोलिसांनी या दोघांचे ऐकून त्यांना ठाण्यात आणले. थोड्याच वेळात अकोला येथील एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे बाळापूरवर वॉच ठेवून असतात, ते पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी प्रकरण मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, प्रेमीयुगुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी नातेवाईक असल्याची बतावणी करून गप्पा मारत असल्याचे सांगितले.