आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंतीवर लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्तापक्षातील बड्या नेत्याच्या पोस्टर्सवर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अकोट येथील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव सय्यद मतीन अहमद यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्प अभियानाचे पोस्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंतीवर लावले होते. या पोस्टर्समुळे शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण झाल्याच्या कारणावरून जिल्हा प्रशासनाने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाचे कर्मचारी ताराचंद भिकाजी चव्हाण यांनी शुक्रवारी सय्यद मतीन अहमद यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्याविरुद्ध कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे, तर सय्यद मतीन अहमद यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले असतील, त्याविषयी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.