आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७२ दत्तक मुलांवर घडणार सर्वांगीण सुसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची कास धरत त्यांचे विचार, ग्रामगीता घराघरांत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ७२ मुलांवर सर्वांगीण सुसंस्कार घडणार आहेत. ग्राम जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील १३० गावांमध्ये फिरून प्रत्येक गावातून एक मुलगा दत्तक मागितल्यानंतर मिळालेल्या मुलांचे सुसंस्कार शिबिर आज, १० मेपासून प्रारंभ झाले आहे.
अकोला जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनाथ, गरजू, आईवडिलांचे वा दोघांपैकी एकाचे छत्र हरवले असा मुलगा आम्हास द्या, आम्ही त्याला सुसंस्कारीत करून गावास परत करू, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले. त्या माध्यमातून ७२ मुलांची नोंदणी झाली आहे. यापैकी गरजू मुलांचे १२ वीपर्यंतचे शिक्षण, निवास, भोजन आदी सर्व खर्च करण्याचीही मंडळाची तयारी आहे. मुले संस्कारित झाल्यानंतर त्यांना संवादिनी, खंजिरीसह त्यांच्या गावात इतरांवर संस्कार करण्यास पाठवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सेवाधिकारी भानुदास कराळे यांनी दिली. आज, १० मे ला सायंकाळी महादेवराव भुईभार, अॅड. रामसिंह राजपूत, गोवर्धनदादा खवले, बबनराव कानकिरड, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर आदींच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
अशी राहील दिनचर्या
सुसंस्कार शिबिरात दररोज सकाळी वाजता प्रात:स्मरण स्नानसंध्या, वाजता ध्यान, वाजता योगासन, वाजता रामधून, वाजता अल्पोपहार, वाजता मैदानी खेळ, १०.३० ते १२ ग्रामगीता तत्त्वज्ञान, १२ ते दरम्यान भोजन विश्रांती, ते ४.३० दरम्यान भजन, संगीत प्रशिक्षण, ते ६.३० प्रबोधन, ते सामुदायिक प्रार्थना, वाजता राष्ट्रवंदना, भोजन निद्रा अशी दिनचर्या राहील.
बातम्या आणखी आहेत...