आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात धावणार 13 नव्या रुग्णवाहिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एक तासाच्या आत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी सुसज्ज अशा 13 जीवनदायी रुग्णवाहिका आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत उपचाराअभावी मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी प्रत्येक जिल्हय़ाला स्वतंत्र 15 ते 20 रुग्णवाहिका प्राप्त होत आहे. अकोल्यात या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, शहरी भागासाठी दोन लाख लोकसंख्या आणि ग्रामीण भागासाठी एक लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यान्वित झाल्या आहेत. या रुग्णवाहिका प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालय, राष्ट्रीय महामार्ग, पोलिस स्टेशन किंवा तहसील आवारामध्ये 24 तास उभ्या राहतील.

108 डायल करा
या योजनेच्या लाभासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक डायल करा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.