आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला मिळणार "फ्रेश' आयएएस अधिकारी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘कोणीहीयावे आणि टिकली मारुनी जावे’, अशी विचित्र परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे. केवळ नगरसेवकच नव्हे तर सामान्य कर्मचारीही स्वत:ला साहेब समजायला लागले आहेत. आयुक्त सोमनाथ शेटे यांची प्रशासकीय कामकाजावरील पकड सैल झाल्याने महापालिकेचे कामकाज कोलमडले आहे. या प्रकाआता राला आयुक्तही कंटाळले असून, ते बदलीच्या मूडमध्ये आहेत. दरम्यान, शासनाने आता महापालिकेला नव्या दमाचा आयएएस अधिकारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

आतापर्यंत आलेल्या आयुक्तांपैकी बोटावर मोजण्याइतक्या आयुक्तांना आपला दबदबा निर्माण करता आला. यात चंद्रशेखर रोकडे, महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांचा समावेश आहे. परंतु, इतर आयुक्तांना आपला दबदबा निर्माण करता आला नाही. आताही विद्यमान आयुक्त सोमनाथ शेटे यांना प्रशासनावर पकड निर्माण करता आलेली नाही. त्या तुलनेने उपायुक्त माधुरी मडावी यांनी प्रशासनावर पकड निर्माण केली आहे. परंतु, त्यांना पूर्ण अधिकार नसल्याने एका मर्यादेच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. यामुळे महापालिका की महाग्रामपंचायत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे प्रशासनावरील पकड सैल झालेली असताना दुसरीकडे केवळ देयके काढण्यावरच भर दिला जात आहे. देयके काढण्याबाबत आयुक्तांवर थेट सभेत आरोप होतात. परंतु, अद्यापही या आरोपाचे खंडण अथवा उत्तर आयुक्तांनी दिलेले नाही. त्यामुळे नगरसेवकही आता देयके काढण्यासाठी सरसावले आहेत.

आयुक्त सोमनाथ शेटे आता सुरू असलेल्या प्रकाराला कंटाळले आहेत. त्यांनीही बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आहे. सात ते दहा दिवसांत त्यांची बदली होऊ शकते, अशी चर्चाही महापालिका वर्तुळात सुरू आहे.

नव्या दमाचा अधिकारी?
महापालिकेतीलबेशिस्तीला लगाम लावण्यासाठी शासनाने नव्या दमाचा आयएएस अधिकारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. परिविक्षाधीन कालावधीतच या अधिकाऱ्याला महापालिकेत पाठवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केली नाराजी
महापालिकेचेनाव मंत्रालयातही चांगले घेतले जात नाही. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. अकोला महापालिकेत बदली म्हटलं की अधिकारी जाण्यास तयार होत नाही.
सत्ताधारी गटातही गटबाजीचे राजकारण
एकीकडेप्रशासनावरील पकड सैल झालेली आहे तर दुसरीकडे सत्ताधारी गटात गटबाजीचे राजकारण सुरू आहे. प्रत्येक गट सोयीचे राजकारण करत असल्याने गोंधळाची स्थिती असून सत्ताधाऱ्यांचीही बदनामी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...