आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्टी फस्र्ट’साठी तरुणाई सज्ज, नववर्षाच्या स्वागताचे अनेकविध फंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘थर्टी फस्र्ट’ सेलिब्रेशनसाठी अकोलेकर तरुणाई सज्ज झाली असून, त्या अनुषंगाने विविध प्रकारचे नियोजन केले आहे. शहरातील हॉटेल्स, बार मालकांनीही यासाठी कंबर कसली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्ह्यातील बिअर बार व हॉटेल्स मालकांना पहाटे पाचपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची संमती दिली आहे.

31 डिसेंबरच्या रात्री मावळत्या वर्षाला ‘गुडबाय’ करून नवीन वर्षाचे वाजतगाजत स्वागत करणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढत असून, स्वागतात वैविध्यही दिसून येते. कोणी शहरातील मार्गांवर वेलकम 2014, गुडबाय 2013, हॅपी न्यू इअर, नवीन वर्षाचे स्वागत यांसारखे संदेश रात्री रस्त्यावर लिहितात. चुना, गेरूने हे रंगकाम केले जाते, तर काही जण आकर्षक रांगोळी रेखाटतात. काही जण केवळ मोबाइल व सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रमंडळीला शुभेच्छा देतात. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी शहरातील हॉटेल्स व बिअर बारवर दरवर्षी मोठी गर्दी दिसते. एका रात्रीतून कोट्यवधींचे मद्य रिचवले जाते.

या पार्श्वभूमीवर हॉटेल्स व बिअर बार मालकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी खास तयारी केली असून, आकर्षक सजावटीसाठी रात्री बाराच्या ठोक्याला नववर्षाभिनंदन करणे, केक कापणे, फुलांचा वर्षाव असे कार्यक्रम राहणार आहेत. सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये खास नववर्ष साजरे करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘इंडियन आयडॉल ’ फेम अनन्या मिर्शा हजेरी लावणार आहे. यासोबतच अनेक ठिकाणी संगीत मेजवानीची व्यवस्था राहणार आहे. काही हॉटेल्स मालकांनी ग्राहकांच्या मागणीनुसार सोय करून देण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये कोणाला नृत्य, गायनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, कोणाला भलामोठा केक कापून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे, कोणाला विशेष खेळांचे आयोजन करायचे आहे, त्यानुसार व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच खास शौकिनांसाठी व्हेज व नॉनव्हेजच्या अनेकविध डिश राहणार आहेत.