आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार, हॉटेल्सराहणार पहाटे 5 पर्यंत सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नववर्षाच्या स्वागतासाठी सज्जता झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यातील बिअर बार आणि हॉटेल्स् मालकांना पहाटे 5 पर्यंत हॉटेल्स् सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

देशात सर्वत्र विविध पद्धतींनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक नियोजन करतात. सोबतच हॉटेल्स् आणि बिअर बार मालकांनीही 31 डिसेंबरसाठी नियोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा उत्साहात नागरिक नववर्षाचे स्वागत करतात. स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही खास सूट दिली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील हॉटेल्स् संचालकांनी मेन्यूही ठरवला आहे. ‘थर्टी फस्र्ट’साठी जिल्ह्यातील हॉटेल्स व्यावसायिक, ढाबे, बार सज्ज झाले आहेत. मद्यविक्रेत्यांनी अतिरिक्त बुकिंग सुरू केले आहे. यंदा चार कोटी रुपयांची मद्यविक्री होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नववर्षाचे स्वागत कोणत्या हॉटेल्स्मध्ये करायचे याचे नियोजन युवावर्ग करत आहेत. इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे. ‘थर्टी फस्र्ट’च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागानेदेखील नियोजन केले आहे.

तळीराम रिचवणार दीड कोटींचे मद्य : मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकजण मद्यप्राशन करतात. या अनुषंगाने शहरासह जिल्ह्यात नियमित विक्रीपेक्षा दीड ते दुप्पट बिअर व दारूची विक्री होणार आहे. अतिरिक्त बिअर आणि दारू विक्रीचे नियोजन बिअर बार व हॉटेल्स् मालकांनी केले आहे. ‘थर्टी फस्र्ट’ला तळीराम सुमारे दीड कोटींची बिअर व दारू रिचवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांची गस्त राहणार चोख : ‘थर्टी फस्र्ट’ला शहरासह जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस सज्ज आहेत. या रात्री नाकाबंदी, वाहनांची तपासणी, मद्यप्राशन करणार्‍यांची झाडाझडती घेण्यात येते. नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करण्यात येते.