आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात तेरावा महिना; जावयांसाठी सुकाळ तर सासऱ्यांना दुष्काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यात भरीस भर म्हणजे, यंदा १७ जूनपासून अधिक महिना सुरू होणार आहे. २६ जुलैला त्याची सांगता होईल. त्यामुळे यंदा ऐन पेरणी पाण्याच्या दिवसांत दुष्काळात तेरावा महिना ही उक्ती प्रत्यक्षात साकार होणार असून, जावयांसाठी ही पर्वणी ठरणार आहे, तर पारंपरिक रुढीमुळे सासऱ्यांना खऱ्या अर्थाने दुष्काळाची झळ बसणार आहे.
मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात. परंतु, दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला अधिक मास म्हणतात. यामध्ये पारंपरिक व्रतवैकल्यांसोबतच जावईबापूंचीसुद्धा सरबराई केली जाणार आहे. जावयांना दान दिल्याने पुण्य मिळते, असा पिढ्यान् पिढ्याचा समज आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या सासरेबुवांना ही सरबराई चांगलीच जड जाणार आहे. यामध्ये जावयांना खायला दिल्या जाणाऱ्या धोंड्यामध्ये सोन्या, चांदीचे दान दिले जाते. ही प्रथा आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण, सद्य:स्थिती पाहता अनेकांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, दुष्काळाची अधिक झळ बसणार आहे.
काय आहे अधिक मास? : ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात, तर मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस असतात. ख्रिश्चन कालगणना चंद्रावर, तर मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. ख्रिश्चन कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष असते, तर मराठी कालगणनेच्या दिवसांची तूट भरून काढण्यासाठी दर ३२ महिने १६ दिवसांनी म्हणजेच तीन वर्षांनी येणारा महिना हा अधिक मास ठरवला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सप्ताह की आठवडा?...लग्नासाठी सहा मुहूर्त...