आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनमानी कारभार: शेतकरी अकोटच्या कृषी विभागात अन् कर्मचारी गायब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- खरीप हंगामासाठी मार्गदर्शन मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी मिळून येत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. कृषी खात्यातील सर्वच अधिकारी-कर्मचारी एकाच वेळेस कार्यालयातून गायब असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता पाहायला मिळाला.
अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची वेळ सकाळी १० वाजता सुरू होते. मात्र, अधिकारी कर्मचारी १२ वाजेपर्यंतही कार्यालयात येत नाहीत. त्यांची वाट पाहत दूरवरून आलेले शेतकरी ताटकळत बसून असतात. मात्र, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा वचक नाही. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची या अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र, हे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळे नुकतीच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. हे प्रकरण ताजे असतानाच अकोट कृषी अधिकारी कार्यालयातील ही अनागोंदी उघडकीस आली आहे.

कर्मचाऱ्यांचीमनमानी : काहीक्षेत्रीय कर्मचारी आहेत. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि त्यांच्या वरिष्ठांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र, हे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली कार्यालयातच येत नाहीत. स्वत:ची खासगी कामे करत राहतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संत्र्याचे अनुदान रखडले, शेतकरी त्रस्त...
बातम्या आणखी आहेत...