आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग- निसर्गोपचार, निरोगी बालकांसाठी 'योगाभ्यास'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सुदृढ निरोगी बालकांसाठी गर्भवती महिलांनी योगाभ्यास करावा, असा सल्ला योग निसर्गोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. आयुष कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत मार्गदर्शन सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे.
रविवार, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयातील योग निसर्गोपचार तज्ज्ञ उज्ज्वला पाटील यांनी गर्भारपणात योगाचे महत्त्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध सुविधेविषयी माहिती दिली. आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच अधिक रासायनिक खतांचा वापर, भेसळयुक्त पदार्थ, पावडरने िपकवलेले पदार्थ या सर्व कृत्रिम वापरामुळे आपले शरीर रोगी बनत आहे. महिलांची प्रतिकारशक्ती जर कमी असेल, तर याचे दुष्पपरिणाम दूरगामी होतात. प्रसूतीदरम्यान, महिलांचे शरीर कमजोर होऊन होणाऱ्या बाळांनाही विकार होण्याची शक्यता असते. योग हा सामान्य व्यक्तीसाठीच नसून गर्भवतीही योगासने करू शकतात. गर्भसंस्कार गर्भवतींचा आहार, विहार दिनचर्या ही सर्व सुविधा जिल्हा स्त्री रुग्णालयात आयुष विभागात मोफत उपलब्ध आहे.
वेदकाळापासून मानवी शरीर मनाचे आरोग्य योगशास्त्राद्वारे सांभाळले गेले आहे. म्हणूनच योगाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक क्षमता वाढवून महिलांनी शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न निकाेप आरोग्यासाठी योग महत्त्वाचाच आहे. योगाच्या महत्त्वामुळेच योग हा संपूर्ण भारतातच नव्हे, तर विश्वात योगाला सन्मान मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनी संकल्प करून तरी आपण दिवसातील ३० मिनिटे आपल्या शरीरासाठी द्यावे, हा निश्चय केलाच पाहिजे. आज आपल्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. त्याचा मानवाने सन्मान करून आपल्या संस्कृतीची जोपासना करावी, असे आवाहन आयुष विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्त्री रुग्णालयात योग शिबिर
जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी योग शिबिर आयोजित केले आहे. त्याचा गर्भवती महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.

योगाच्या साहाय्याने ठेवा शरीर मन स्थिर
- योगाच्या साहाय्याने मनावर नियंत्रण ठेवता येते आणि मनुष्य शारीरिक आणि मानसिक व्याधीपासून दूर राहतो. शरीराच्या आंतरबाह्य भागांना निरोगी ठेवण्याची क्रिया म्हणजे योगासने. योगाच्या नियमित अभ्यासाने व्यक्ती दीर्घकाळपर्यंत स्वस्थ निरोगी राहू शकतो. योगामुळे शरीरच नव्हे, तर मनही प्रसन्न राहते.''
उज्ज्वला पाटील, योगनिसर्गोपचार तज्ज्ञ.
बातम्या आणखी आहेत...