आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञा, उत्कर्षा, शर्व, समय, आयुषी, मिष्टीने मारली बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ब्रिलियंट चेस अॅकेडमीच्या वतीने आयोजित १३ वर्षांआतील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञा बनवाईत, उत्कर्षा सोनी, शर्व कोलवाटकर, आयुषी भाटिया, मिष्टी अग्रवाल यांनी बाजी मारली.
स्पर्धेचे उद्घाटन अॅकेडमीच्या रश्मी अग्रवाल यांच्या हस्ते झाले, तर स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास अमेरिकेतील वैज्ञानिक प्रा. धर्मप्रकाश अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी पौर्णिमा अग्रवाल, ज्येष्ठ बुद्धिबळपटू विलास अग्रवाल उपस्थित होते. धर्मप्रकाश अग्रवाल म्हणाले, की आपल्या भाषणात बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढून बुद्धीला चालना मिळते. या खेळाचे अनेक फायदे मिळतात, त्यामुळे खेळात सातत्य ठेवावे, असे आवाहन केले. स्पर्धेत १३ वर्षांआतील मुलींच्या गटात प्रज्ञा बनवाईत हिने प्रथम स्थान पटकावले, तर उत्कर्षा सोनी उपविजेती ठरली, तर १३ वर्षांआतील मुलांच्या गटात शर्व कोलवाटकरने बाजी मारली, तर समय वर्मा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
खुल्या गटात महिलांमध्ये आयुषी भाटियाने प्रथम स्थान पटकावले, तर मिष्टी अग्रवाल द्वितीय क्रमांकावर राहिली. खुल्या गटात पुरुषांमध्ये प्रथम स्थान निखिल चौधरीने पटकावले, तर द्वितीय क्रमांक आर्यन अग्रवालने पटकावला, तर राग्वेंद्र गोयनका, ऋषी बगडिया, तेजस सोनी, रौनीत चौबे, हर्षदीप रंगारी, दर्शिल भगत, मित केडिया, जित मुलानी, भूषण मानकर, पीयूष ठकरानी, अथर्व दळवी, गर्वित धानुका, सर्वेश अग्रवाल, आर्यन चौधरी, मनाली कुळकर्णी, आरती देशपांडे, अदिती देशपांडे, श्रेया भंडारी, ईशानी भारसाकळे, प्रथमेश व्यास, नमन अग्रवाल, रोहन दुतिया, मयंक टावरी यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून जितेंद्र अग्रवाल यांनी काम पाहिले.
राग्वेंद्र ठरला आकर्षण : स्पर्धेत१३ वर्षांआतील मुलांच्या गटात अवघ्या सहा वर्षीय राग्वेंद्र गोयनका याने सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. राग्वेंद्र केवळ सहभागीच झाला नाही, तर त्याने उपस्थितांची दाद मिळवली.