आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा शौचालयात गर्भपात, शीट फोडून गर्भ काढला बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गर्भारपणात झालेल्या गुंतागुंतीमुळे महिलेचा शौचालयात गर्भपात झाल्याची घटना शनिवार, २० जून रोजी रात्री ९.३० वाजता घडली. महिलेचा गर्भ संडासच्या शीटमध्ये पडल्याने रुग्णालय प्रशासनाला शीट फोडून गर्भ बाहेर काढावा लागला.
अकोट तालुक्यातील एक महिला शनिवारी सकाळी रक्तस्त्राव झालेल्या स्थितीत जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती झाली.

सुरुवातीपासूनच तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिच्यावर रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू केले होते. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही महिला शौचास गेली. दरम्यान, तिला कळ आली. त्यातच तिचा गर्भपात झाला. अर्धे भ्रूण संडासच्या शीटमध्ये अडकले. महिलेने आवाज दिल्यानंतर परिचारिकांनी धाव घेत तिला तत्काळ शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. गर्भपात करून उरलेेले भ्रूण बाहेर काढण्यात आले. संडासच्या शीटमध्ये अडकलेले भ्रूण बाहेर काढण्यासाठी सफाई कामगारांना संडासची शीट फोडावी लागली. या वेळी रुग्णांनी गर्दी केली होती.
साडेचार महिन्यांचा गर्भपात, उपचार सुरू
- ही महिला रक्तस्त्राव झालेल्या स्थितीत भरती झाली होती. गरोदरपणात बरेचदा अशा घटना घडतात. ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती. साधारणपणे २०० ग्रॅमचा गर्भ असावा. सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.''
डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका.
बातम्या आणखी आहेत...