आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनैतिक संबंधातून राडा; लग्नात मामीसह पतीची पत्नीला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नातेसंबंधबासनात गुंडाळून अनैतिक प्रकारांनी कळसच गाठल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. नात्याने मामी असलेल्या महिलेसोबत संबंध असल्याचे उजागर झाल्यामुळे नातेवाइकांच्या एका लग्नातच स्वत:च्या पत्नीला प्रेयसी असलेल्या मामीच्या मदतीने मारहाण केली, तर पत्नीनेही दोन हात करत पतीच्या मामीला चांगलाच चोप दिला.
गांधी रोडवर शुक्रवारी एक लग्न होते. त्या लग्नात दोन महिलांची संशयावरून तुफान हाणामारी झाली. त्यानंतर प्रकरण सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही महिलांच्या परस्परविरोधी तक्रारी घेतल्या. अमरावती येथे राजापूर परिसरात एक दाम्पत्य राहते. त्यांच्या संसार वेलीवर एक मुलगी आहे. सुखी समाधानाने संसार सुरू असताना पतीचा चुलतमामा अकोला येथे राहतो. त्यामुळे नात्याने मामाच आहे, म्हणून मामाच्या घरी येणे-जाणे आलेच. त्यामुळे त्याचे मामाच्या घरी येणे-जाणे वाढले.
अशातच त्याचे मामीसोबत सूत जुळले. त्यामुळे पत्नी सोबतच्या कुरबुरी वाढल्या. शुक्रवारी मावस भावाचे लग्न अकोल्यात असल्यामुळे पती दोन दिवसांपूर्वी अकोल्याला आला होता, तर लग्नाच्या दिवशी शुक्रवारी पत्नी तिची आई आणि बहिणीसह लग्नाला अकोल्यात दाखल झाल्या. लग्न सोहळा पार पडल्यानंतर मामीसोबत त्याच्या पत्नीची गाठ पडली. या वेळी दोघींमध्ये वाद झाला.
दोघींचीही एकमेकींसोबत चांगलीच झटापट झाली. मामी रक्ताने माखलेले हात घेऊन थेट पोलिस ठाण्यात आली. भाच्याच्या पत्नीने आपणास मारल्याचा कांगावा करू लागली. पण हातावर नखांच्या नव्हे, तर दुसऱ्याच जखमा दिसून आल्याने पोलिसांनी महिलेचा पाणउतारा केला. या वेळी दोन्ही महिलांनी एकमेकींच्या विरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्या. पोलिसांनी त्या दाखल करून घेतल्या.