आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात पावणेतीन हजार शौचालयांची झाली निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये सुमारे पावणेतीन हजार शौचालये बांधण्यात आली आहेत. या वर्षी यापेक्षाही अधिक 25 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाने राज्यात निर्मल भारत अभियान गतिमान करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने राज्यात निर्मल भारत अभियान अधिक यशस्वी करण्यासाठी शासन अनुकूल आहे. यासाठी निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या माध्यमातून विशेष प्रयत्नही करण्यात येत आहे. यामध्ये गवंडी प्रशिक्षण, शौचालय बांधण्यासाठी व्यापकपणे प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी गावागावांत सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या निर्मल भारत अभियानातील अधिकारी व कर्मचारी व्यापकपणे प्रयत्न करत आहेत.

लवकरच जिल्ह्यातील गावागावांत जाऊन शौचालयांचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाद्वारे ‘अँक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यादृष्टीने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी दर दोन महिन्यांनंतर निर्मल भारत अभियानाचा आढावा घेणार आहेत.

तालुका बीपीएल एपीएल एकूण
अकोला 325 387 712
अकोट 540 345 885
बाळापूर 112 106 218
बार्शिटाकळी 120 317 437
मूर्तिजापूर 56 63 119
पातूर 116 118 234
तेल्हारा 55 93 148

‘अँक्शन प्लॅन’ तयार
निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे ‘अँक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी दर दोन महिन्यांनंतर निर्मल भारत अभियानाचा आढावा घेणार आहेत.

निर्मल भारत अभियान जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने व्यापकपणे राबवण्यात येत आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने सातत्याने जनजागृतीही केली जात आहे. हे अभियान राबवण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.’’ प्रवीण इंगळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, निर्मल भारत अभियान

सर्वाधिक शौचालये अकोट तालुक्यात
निर्मल भारत अभियानांतर्गत एपीएल आणि बीपीएल र्शेणीतील नागरिकांनी शौचालये बांधली आहेत. जिल्ह्यात प्रशासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या अभियानांतर्गत सर्वाधिक शौचालये अकोट तालुक्यात बांधण्यात आली आहेत, इतर ठिकाणी साधारण स्थिती आहे, तर सर्वात कमी शौचालये मूर्तिजापूर तालुक्यात बांधण्यात आली आहेत.