अकोला - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत कडुकार यांच्या नियंत्रणात गुड मॉर्निंग पथकाने पातूर तालुक्यात उघड्यावर शौचास बसणार्या 17 व्यक्तींविरुद्ध 23 डिसेंबरला कारवाई केली. या मोहिमेंतर्गत ‘गुड मॉर्निग पथक’ तयार केले आहे. हे पथक तालुक्यातील चार ते पाच गावांत उघड्यावर बसणार्या व्यक्तींना प्रतिबंध घालत आहे. सोमवारी 17 व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या मोहिमेत गटसमन्वयक राजेश राठोड, समूह समन्वयक दिनेश वानखडे, ग्रामसेवक पेंढारकर, राहुल इंगळे, शिवकुमार सज्रे, रविकुमार दंदी यांच्यासह निर्मल भारत अभियानाच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
नागरिकांकडून घेतला मुचलकानामा भरून
उघड्यावर शौचास करणार्या नागरिकांवर पथक कारवाई करत आहे. या 17 व्यक्तींविरुद्ध मुचलकानामा भरून घेतला आहे. यापुढे उघड्यावर शौचास बसणार नाही, अशी शपथ या मुचलकानाम्यातून त्यांनी घेतली आहे.