आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मल गावाचा भोपळा- शौचालय बांधण्याचा आग्रह; मात्र निधीची बोंब, सभेत खडाजंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - घनकचरासांडपाण्याचे व्यवस्थापन केलेले नसल्यामुळे जिल्‍ह्यातील एकही गाव निर्मल झाले नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या जिल्‍हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून नेहमी शाैचालय बांधण्याचा आग्रह केला जातो. मात्र, निधी उपलब्ध करून दिलाजात नसल्याचा आरोप िज. प. सदस्या सरला मेश्राम यांनी केला.

जलव्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा परिषदेत १६ डिसेंबर रोजी झाली. या सभेत पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी यांनी निर्मल ग्राम योजनेत २०१३ वर्षाकरिता प्रस्तािवत करण्यात आलेल्या गावांपैकी एकही गाव निर्मल झाले नसल्याचा खुलासा केला. सदस्य गोपाल कोल्हे यांनी ग्रामपंचायत स्तरावर शौचालयासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले, तर सदस्य राजेश खोणे यांनी बीपीएलची अट शिथिल करण्याबाबत मागणी केली, असेच राहिले तर ५० वर्षांत एकही गाव निर्मल होणार नाही, असा खुलासा केला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ राजगुरू आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

९६० गावांत पाणीटंचाई
जानेवारीते मार्च यादरम्यान ९६० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याचा खुलासा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेेंद्र काेपुलवार यांनी केला आहे. याबाबतच्या कृती आराखड्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

१६३३ उपाययोजना
जिल्ह्यातील६२० गावांमध्ये १६३३ उपाययोजना करण्याबाबतचा ठराव समितीने मान्य केला. सुमारे १३ कोटी ७९ लक्ष रुपये खर्चून पाणीटंचाई निवारणासाठी बुडक्या घेणे, िवहीर खोदकाम, विहीर अधिग्रहित करणे, पाणीपुरवठा योजना, विंधन विहीर, नवीन विहिरी, कूपनलिका यांसारख्या उपाययोजना केल्या जातील.

पुढील वर्षासाठी पेयजल आराखडा : २०१५-१६या वर्षाकरिता पेयजल कृती आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. बोरगावमंजू, घुसर, धोतर्डीसह ६४ गावांचा समावेश आहे. त्सास मान्यता मिळाली आहे.

पाइपलाइनमध्ये अनियमितता
दहीहांडापाणीपुरवठा योजनेमध्ये अनियमितता असल्याचा आरोप सदस्य गोपाल कोल्हे यांनी केला. पाइपलाइनसाठी वापरण्यात येणारे पाइप हे निकृष्ट दर्जाचे असून, खोलीकरणसुद्धा तीन फुटांपेक्षा कमी आहे. त्यामुळे याची चौकशी समितीमार्फत करण्यात येऊन दोषींवर कारवाईची मागणी सदस्य कोल्हे यांनी केली.

स्वच्छ भारताची पिछाडीकडे वाटचाल
जिल्ह्यातस्वच्छ भारत अभियानाची पिछाडीकडे वाटचाल सुरू असल्याचे वास्तव सभागृहात सर्वांच्यासमोर आले. यािशवाय स्वच्छ भारत मिशननेसुद्धा ३८ टक्केच उद्दिष्ट साध्य केले आहे. यामध्ये अकोला १० टक्के मूर्तिजापूर तालुक्यात १७ टक्के काम झाले आहे, तर अकोट टक्के, बाळापूर टक्के, बार्शिटाकळी तालुक्यात टक्के, पातूर तालुक्यात टक्के, तर तेल्हाऱ्यात टक्के काम झाले आहे. त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचनि्ह आहे.