आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मल ग्राम समितीकडून गावांची पाहणी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - निर्मल ग्राम पुरस्कार परीक्षण समिती अकोल्यात दाखल झाली असून, 12 फेब्रुवारी रोजी या समितीने पाच गावांची पाहणी केली. या समितीने मांडोली (ता. बाळापूर), वारखेड (ता. तेल्हारा), तरोडा (ता. अकोट), देऊळगाव, बोर्डी (ता. अकोट) अशा पाच गावांची दोन चमूमार्फत तपासणी केली.


सेंटर फॉर अँडव्हांस रिसर्च डेव्हलपमेंट भोपाळ या संस्थेचा केंद्रस्तरीय समितीच्या चमूसोबत तपासणी कार्यात सहभाग होता. निर्मल भारत अभियानाचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश डहाके, एचआरडी कन्सल्टंट अरविंद कडाळे, आयईसी तज्ज्ञ अर्चना डोंगरे, मूल्यांकन व संनियंत्रण तज्ज्ञ राहुल गोडले अधिकारी या समितीत सहभागी होते. 13 फेब्रुवारी रोजी चान्नी, अंबाशी (ता. पातूर), खडकी बु. (ता. अकोला), कोथळी (ता. बार्शिटाकळी) ही गावे तर 14 फेब्रुवारी रोजी बिडगाव, सोनोरी (ता. मूर्तिजापूर), डोंगरगाव (ता. अकोला) ही गावे दोन चमूमार्फत तपासण्यात येणार आहेत.


वैयक्तिक शौचालय, अंगणवाडी स्वच्छता, शालेय स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा वापर, माहिती शिक्षण व संवाद उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी व्यवस्थेची समितीमार्फत पाहणी करण्यात आली. 13 गावांचे परीक्षण झाल्यानंतर पुरस्कारासाठी गावांची निवड केली जाणार आहे.