आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Launched The Work Of The Hands Of Four Crore At Akola, Divya Marathi

अकोल्‍यामध्‍ये नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते चार कोटींच्या कामाचा शुभारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी व हरिहरपेठपासून ते खटाऊ जीनला जोडणार्‍या पुलाचे भूमिपूजन आज भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. हरिहरपेठेत पंचशील ध्वजाचे पूजन, कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी केले. दीपक मायी यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, नगरसेवक विजय अग्रवाल, आशीष पवित्रकार, सुरेश अंधारे, सतीश ढगे, गायत्रीदेवी मिर्शा, स्वीकृत नगरसेवक प्रतुल हातवळणे, पवन पाडिया, रणधीर सावरकर, दीपक मायी, माजी महापौर अश्विनी हातवळणे आदींची उपस्थिती होती.

गोवर्धन शर्मा अजातशत्रू : गोवर्धन शर्मा यांच्यासारखे आमदार शोधून सापडत नाही. उमेदवारी देण्याच्या वेळेस ते इतरांना संधी द्या, असे म्हणत स्वत:ला दूर ठेवतात. मंत्री करण्यासाठी आमदार धावपळ करतात. पण, गोवर्धन शर्मा यांना मंत्री केल्यावर राजीनामा देत व दुसर्‍याला संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न पक्ष विस्ताराचे काम करत आहे. मंत्री करू नका, असे सांगणारे ते आमदार आहेत.

लोकाभिमुख नेता : फडणविस : आमदारांना विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी मिळतो. आमदार शर्मा यांनी चार कोटी 21 लाखांचा निधी शासनाकडून खेचून आणत जनतेला दिलासा दिला,असे मत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारची अनियमितता
केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने महागाई, घोटाळा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून सर्वोच्च पातळीवर अनियमितता केली आहे. या सरकारने जिथे जाऊ, तिथे खाऊ अशा धोरणाचा अवलंब केला. त्यामुळे देश संकटात सापडला आहे. अकोल्यातील जनतेची सेवा करण्यासाठी संजय धोत्रे यांना लोकसभेत पाठवा. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी, बेरोजगार युवक, अडचणीत सापडलेले तरुण, महागाई यावर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाचे नेतृत्व द्यावे लागेल. आकाशात, जमिनीवर व जमिनीखाली काँग्रेसने पैसे खाल्ले. नितीन गडकरी, राष्ट्रीय नेते, भाजप.