आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी कर्जाकडे बँकांचे दुर्लक्ष ; खरीप हंगामात केवळ 28 टक्के कर्जवाटप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असताना राष्ट्रीयीकृत बँकांच जिल्ह्यातील शेतक-यांच्या तोंडाला पान पुसण्यात गुंग आहे. त्यामुळे शेतकरी नाइलाजास्तव खासगी सावकारास बळी पडत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात केवळ 28 टक्के उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांनी पूर्ण केले असून इतर खासगी बँकांनी कृषी क्षेत्राच्या कर्जाकडे पाठ फिरवली. या खासगी क्षेत्रातील बँकांनी केवळ दहा टक्के कर्ज पुरवठा कृषी कर्जाला खरीप हंगामात केला आहे. गेल्या महिन्याभरात पाऊस न आल्यामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी आता अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्यात बँका कर्ज देण्यास तयार नसल्याने अधिकच भर पडली. राष्ट्रीयीकृत बँकांनी कमी व्याजदरावर शेतक-यांना कृषी कर्ज देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून तसे होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर गावातील खासगी सावकारासमोर हात पसरण्याची वेळ कास्तकारांवर आली आहे.

असंघटित शेतकरी
शेतकरी संघटीत नसल्याचा फायदा अनेकांना होता तसा तो कर्ज वाटप करणा-या संस्थांना होत आहे. त्यातच शेतक-यांचे बहूतांश नेते हे शहरात राहत असल्याने त्यांना ग्रामीण भागात शेतक-यांना कर्ज मिळण्यासाठी सोसावे लागणारे हेलपाटे ज्ञात नाहीत. अशा परिस्थितीत वास्तविकतेशी नाळ तुटलेले नेते ख-या अर्थाने शेतक-यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात.