आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपविभागातील ‘सावित्रीच्या लेकीं’ची पायपीट सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर - शाळा सुरू होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला तरी देखील मेहकर उपविभागातील सर्व शाळांमधील विद्यार्थीनींना बसअभावी शाळा ते घरापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागत आहे.

एकही विद्यार्थींनी शाळाबाह्य राहू नये, तसेच सातवी पास झाल्यानंतर मुलींनी शिक्षण बंद करू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना शाळा ते घर प्रवासासाठी मोफत बस सेवा सरू केली. मात्र 26 जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतरही मेहकर आगारामधून लोणार, मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शाळांमधून मुख्याध्यापकांमार्फत विद्यार्थीनींना पास देण्यात येतात. मात्र यावर्षी मुख्याध्यापकांनी मेहकर, लोणार व सिंदखेडराजा येथून पास न नेल्याने आठवडाभरापासून विद्यार्थीनी शाळा ते घर पायीच प्रवास करत आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतरही मानव विकासच्या बस गावांपर्यंत पोहोचल्या नसल्याने मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. मुलींची होणारी हेळसांड थांबवून त्यांना बस उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थींनींसह पालकवर्गातून होत आहे. मुख्याध्यापकांचे होणारे दुर्लक्ष चिंताजनक असल्याचा सूर पालकवर्गातून निघत आहे. माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापकांनी आगारामधून विद्यार्थीनींच्या बस पासेस न नेल्यामुळे कोणत्या मार्गावर बस पाठवायच्या याची माहिती नसल्याने आगारातून मानव विकास मिशन अंतर्गत 26 जून पासून एकही बस सोडण्यात आली नसल्याची माहिती वरिष्ठ लिपिक टेकाळे यांनी दिली.

मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळेच बस बंद
माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापकांच्या दुर्लक्षामुळेच सावित्री व जिजाऊंच्या लेकींनी घर ते शाळा पायीच प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थीनींच्या पासेससंबंधी मुख्याध्यापक येऊन न गेल्याने कोणत्या मार्गावर बस सोडावी याची कल्पना नसल्याने मानव विकासच्या बसेस सोडू शकत नसल्याची माहिती लिपिक टेकाळे यांनी दिली.