आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Coverage Within Four Kilometer Area, Tower Seal In Akola

चार चौरस किलोमीटर क्षेत्रातील संवाद ‘म्यूट’, अकोल्यात मोबाइल टॉवर सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कारवाई करताना उपायुक्त माधुरी मडावी अधिकारी.
अकोला - शहरातीलचार मोबाइल टॉवर महापालिकेने दोन फेब्रुवारीला सील केले. त्यामुळे शहरातील चार चौरस किलोमीटर परिसरातील संवाद म्यूट झाला आहे. या चार टॉवरकडे एकूण सात लाख ३० हजार रुपये कर थकित आहे.

वोहम् नेटवर्क कंपनीचे शहरात ३५ मोबाइल टॉवर आहेत. विविध मोबाइल कंपन्या या टॉवरचा नेटवर्कसाठी उपयोग करतात. या ३५ टॉवरपैकी चार टॉवरचा कर थकित आहे. न्यू राधाकिसन प्लॉट, खंडेलवाल भवन समोरील श्रीराम टॉवर, मोहिनी बारच्या गॅलरीवर आणि जुन्या बाळापूर मार्गावरील भिरडवाडी या भागातील टॉवरचा २०११-२०१२ पासून कर थकित आहे. या थकित कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागाने सूचना केल्या. परंतु, संबंधित कंपनीने थकित कराचा भरणा केला नाही. उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी हे चारही मोबाइल टॉवर सील केले. ही कारवाई माधुरी मडावी, शहर अभियंता अजय गुजर, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कैलास पुंडे, कर अधीक्षक विजय पारतवार, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, सहायक आयुक्त राजेंद्र घनबहादूर, अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, अमोल डोईफोडे यांनी केली.

साधारणत: एका टॉवरच्या माध्यमातून एक चौरस किलोमीटर क्षेत्रात नेटवर्क पुरवल्या जाते. चार टॉवरवर सीलची कारवाई झाल्याने शहराच्या विविध भागातील चार चौरस किमी क्षेत्रातील नेटवर्क बंद झाले.

कंपनीलाहीद्यावी लागणार नुकसानभरपाई : याचार मोबाइल टॉवरवर वोडाफोन, टाटा डोकोमो, युनिनॉर या मोबाइल कंपन्या नेटवर्क घेतात. कराचा भरणा करण्याची जबाबदारी टॉवरचा हक्क असलेल्या कंपनीकडे आहे. त्यामुळे आता जोपर्यंत कराचा भरणा करून सील जोडले जाणार नाही, त्या वेळेत या मोबाइल टॉवर सीलमुळे या कंपन्यांच्या मोबाइलचा वापर होऊ शकला नाही. यामुळे या मोबाइल कंपनीचे जेवढे नुकसान झाले असेल तेवढी नुकसानभरपाई टॉवरचा हक्क असलेल्या कंपनीला संबंधित मोबाइल कंपन्यांना द्यावी लागेल.

अशी केली कारवाई
टॉवरलाविद्युत, जनित्र तसेच बॅटरी बॅकअप यापासून वीजपुरवठा केला जातो. टॉवरला कुलूप लावून सील करता येत नाही. त्यामुळे टॉवर कार्यरत राहण्यासाठी वीजपुरवठा, जनित्र आणि बॅटरी बॅकअपचा पुरवठा खंडित करून त्याला सील ठोकण्यात आले.

असा आहे थकित कर
*न्यूराधाकिसनप्लॉट- २०११पासून थकित - लाख २८ हजार १९७
*खंडेलवाल भवनसमोर- २०१२पासून थकित - लाख ७२ हजार ४४ रुपये
*मोहिनी बारच्यावर - २०१३पासून थकित - लाख ६५ हजार ५६४
*भिरडवाडी -२०११पासून थकित - लाख ६५ हजार ६५६