आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यासाठी चार वर्षांपासून 'मेडिक्लोर'ची खरेदीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना जिल्हा आरोग्य प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. गत चार वर्षांपासून मेडिक्लोर खरेदीच झाली नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. मागील वर्षीच खरेदी केल्याचा कांगावा आरोग्य विभाग करत असला तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामसेवकांनी गावात ब्लिचिंग मेडिक्लोरचा साठा आलाच नाही, असे लेखी कळवले आहे. यामुळे आरोग्य पंचायत विभाग दूषित पाण्यामुळे तोंडघशी पडला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पाणीपुरवठा, आरोग्य पंचायत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येतो. आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यात केलेल्या तपासणीत १००९ गावांत मध्यम तीव्र स्वरूपाचे १७०० नमुने दूषित आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला दोष दिला आहे, तर पंचायत विभागाने आरोग्य विभागावर दोषारोपण करणे सुरू केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन असताना आरोग्य विभागाने मेडिक्लोरची खरेदी केली होती. तसेच गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मेडिक्लोरचा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सभागृहाने दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाच्या स्टोअर विभागाने काही गावांत मेडिक्लोर खरेदी केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात मात्र गेल्या चार वर्षांपासून आम्हाला मेडिक्लोर मिळाले नसल्याचे ग्रामसेवकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी कळवले आहे. त्यामुळे नेमके खरे-खोटे काय, याची पडताळणी विद्यमान सीईओंनी करणे गरजेचे झाले आहे.

दूषित पाण्याची कारणे
तलावात,नळ किंवा बोअरजवळ नाल्याचे पाणी, नाला, सांडपाणी, अंघोळीचे पाणी जमा होत असल्यास पाण्यामध्ये अणू जीव तयार होण्याचे प्रमाण वाढत जाते. यातून पाणी पिण्यास अयोग्य ठरवण्यात येते. असे पाणी पिणे शरीरास घातक ठरत असते.

आजारांची भीती
दूषितपाण्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असून, विविध आजारांना सामाेरे जावे लागत आहे. दूषित पाणी पिण्यामुळे शरीरामध्ये ८० टक्के रोग उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यातून कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार साथीचे रोग होतात. या सर्व आजारांकडे मात्र नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

गतवर्षी केली खरेदी
गतवर्षीसेस फंडातून आरोग्य विभागाच्या स्टोअर विभागाने मेडिक्लोरची खरेदी केली होती. शासनाकडून साठा आला नाही.'' डॉ.भास्कर सगणे, साथरोग अधिकारी

जबाबदारी नाहीच
गावातशुद्ध पाणी पुरवणे ही आमची जबाबदारी नाही. ती ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. त्यांनी याकडे लक्ष द्यावे.'' सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता

जलसुरक्षक करतात तरी काय?
जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यांनी हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. आपली तहान भागवण्यासाठी नागरिकांना मिळेल त्या पाण्यात समाधान मानावे लागत असून, पिण्यास शुद्ध किंवा दूषित याची चिंता करता जसे असेल त्या पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी जलसुरक्षकांची आहे. मात्र, जलसुरक्षकांनी जर शुद्ध पाणीपुरवठ्याकडे लक्ष दिले असते, तर दूषित पाण्याचे स्रोत आढळले कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

हे करावे
>नागरिकांनी पाणी पिण्याअगोदर गाळून प्यावे.
>ग्रामपंचायतींनी प्रामुख्याने बोअर, विहिरीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. जेणेकरून पाण्यातील जीवाणू मरून जातील.

काय आहे मेडिक्लोर
मेडिक्लोरहे पाणी निर्जंतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे द्राव्य आहे. यामुळे पाणी शुद्ध होऊन त्यातील जीवजंतू मरून जातात. ३० मि.ली. मेडिक्लोरची किंमत २८ रुपये आहे.
बातम्या आणखी आहेत...