आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काले मेघा काले मेघा पानी तो बरसावो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरावर शनिवारी संध्याकाळी पसरलेल्या काळ्या ढगांमुळे नाराज असलेला वरुणराजा बरसावा, यासाठी अकोलेकरांनी प्रार्थना केली. मात्र, पाऊस नेहमीप्रमाणे हुलकावणी देऊन निघून गेला. शहरानजीक काही ठिकाणी तुरळक पाऊस आला. मात्र, शेतकरी आता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहे.

पेरणीसाठी पुरेसा पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे बियाण्यांची खरेदी मंदावली. सोयाबीनचे बियाणेच महाबीजने उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे मोठी ओरड होती. पण, आता पाऊसच न झाल्याने शेतकरीदेखील हातावर हात ठेवून बसले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वांच्या नजरा पावसाकडे आहेत. पश्चिम विदर्भात मुख्यत: कोरडवाहू शेती असल्याने पावसावरच सर्वकाही अवलंबून असते. पावसावर येथील सर्व अर्थकारण आहे. पुरेसा पाऊस आणि हातात आलेल्या पिकावर बाजारपेठेतील गर्दी, व्यापार अवलंबून असतो. दरम्यान, आज दुपारपासून विजेचा लपंडाव सुरु होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.