आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non legal Development, Latest News In Divya Marathi

रामनगरातील गैरकायदेशीर ‘ती’ विकासकामे थांबवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रामनगर येथील खेळाचे मैदान व सांस्कृतिक भवनाच्या जागेवर विकासकामे, रस्त्यांचे खडीकरण होत असून, ते गैरकायदेशीर असल्याचा आरोप करून सदर कामे त्वरित थांबवावीत, अशी मागणी भाजप नगरसेवक आशीष पवित्रकार यांनी केली आहे. येथील मौजे उमरखेड येथे प्रस्तावित विकास नियमावलीनुसार (डीपी प्लॅन) ई.पी. 19 व 20 यावर अधोरेखित केलेली सांस्कृतिक भवन व खेळाचे मैदान दर्शवण्यात आले आहे. शासन स्तरावर ही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. असे असतानाही या ठिकाणी थेट रस्ते तयार करण्यात येत असून, खडीकरणासाठी आवश्यक गिट्टी, मुरूम जमा करण्यात आला आहे. हे गैरकायदेशीर असून, येथे होणारा विकास त्वरित थांबवावा. विनोदकुमार तोष्णीवाल यांनी गैरकायदेशीरपणे महापालिकेत संबंधित विभागाची दिशाभूल करून गुंठेवारी पद्धतीने भूखंडाचा विकास सुरू केल्याचा आरोप करीत हा सर्व प्रकार त्वरित थांबवा, अशी तक्रार व मागणी भाजप नगरसेवक आशीष पवित्रकार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणात विनोदकुमार तोष्णीवाल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.