आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील ब्रेकनंतर आजच्या ‘कर’मुळे अकोल्यात खवय्यांची चंगळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पोळ्याचा उत्सव आनंदात साजरा झाला असून, नॉनव्हेज शौकिनांना करीचे वेध लागले आहेत. उद्या, 6 सप्टेंबरला कर साजरी करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक सरसावले असून, नॉनव्हेजच्या खवय्यांसाठी चिकन, मटन, मासे व अंड्यांच्या विविध डिश उपलब्ध आहेत.

दरवर्षी होळी व पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी येणारी कर ही मांसाहारासाठी ओळखली जाते. त्याची प्रतीक्षा अनेकांना आठवडाभरापासून असते. र्शावणाच्या ब्रेकनंतर अनेकजण या करीला नॉनव्हेजचा स्वाद चाखणार आहेत. त्यांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकही सरसावले असून, अनेकविध डिशेश तयार होत आहेत. शहरातील हॉटेलमध्ये खास वर्‍हाडी स्वादात मटन, चिकनसह मच्छीच्या डिश मिळणार आहेत. यामध्ये मटन रोगनगोश, चिकन रोगनगोश यासह डब्बा चिकन ही डिश राहील. यासोबतच मटन, अंडी, चिकन, माशांच्या डिश उपलब्ध राहतील, अशी माहिती प्रशांत देशमुख यांनी दिली, तर दुसर्‍या हॉटेलमध्येही नॉनव्हेज शौकिनांसाठी सर्व प्रकारच्या डिश उपलब्ध आहेत. करीसाठी स्वाद देण्याचा प्रयत्न असून, स्नॅक्स व डिश उपलब्ध असल्याचे जसपालसिंह नागरा यांनी सांगिंतले. अन्य एका हॉटेलमध्ये करीसाठी मटन रोगनगोश, मटन मोगलाई, वर्‍हाडी मटन, मटन हैदराबादी, चिकन रोगनगोश, चिकन मोगलाई, चिकन वर्‍हाडी, चिकन हैदराबादीसह ताजी मासळी उपलब्ध राहणार आहे. स्नॅक्समध्ये भरवा तंगडी, पहाडी कबाब, बोटी कबाब, सिक कबाब, रेशमी कबाब उपलब्ध आहे. अंड्यामध्ये अंडा चिली, अंडा पकोडा, अंडा बिर्याणी, अंडा मेथी, भुर्जी, बॉइल, करी आदी राहीलच, असे व्यवस्थापक सुनील बुडुख यांनी सांगितले.

खास चुलीवरचे मटन अन् भाकरी
नॉनव्हेज शौकिनांकडून अलीकडे चुलीवर शिजविलेल्या मटन व चिकनसह ज्वारीच्या भाकरींना मागणी असते. त्यामुळे करीसाठी शहरातील हॉटेलमध्ये चुलीवर शिजवलेले मटन, चिकन, मासे पारंपरिक मसाल्यांसह मिळणार आहे. चुलीवरील ज्वारी, बाजरीची भाकरी, पोळ्या, तवा रोटी, नान, तंदुरी रोटी आदी उपलब्ध राहील.