आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Give False Information For Daughter Passport Devyani Khobragade

मुलींचा पासपोर्ट घेताना चुकीची माहिती दिली नाही, देवयानी खोब्रागडे यांची स्पष्‍टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - माझ्या मुलींना एका ठिकाणचे नागरिकत्व स्वीकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या अमेरिका किंवा भारत यापैकी एका देशाचे नागरिकत्व नक्की स्वीकारतील, असे स्पष्ट करत मुलींचा पासपोर्ट घेताना मी कोणतीही खोटी वा चुकीची माहिती दिली नाही, अशी स्पष्टोक्ती आयएफएस अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी अकोला येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
यूएसएमध्ये पासपोर्ट घेणे अनिवार्य होता. त्यामुळे मी पासपोर्ट मिळवला. मुलींचा पासपोर्ट बनवताना मी कोणतीही माहिती लपवली नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. रिपोर्ट खोटे आहेत. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. अमेरिकेतील वागणुकीबाबत मात्र त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलण्याचे टाळले.

मी फक्त फ्लॅट मेंबर आहे
मुंबईतील आदर्शमध्ये सीबीआय तपासात कुठेही त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे व त्या स्वत: दोषी नाही. याही ठिकाणी कोणतीही चुकीची माहिती दिली नसल्याचे त्या म्हणाल्या.