आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सहा दिवसांआड होणार पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महान जलशुद्धीकरणातील नादुरुस्त पंपाच्या अकार्यक्षमतेमुळे तसेच काटेपूर्णा प्रकल्पातील कमी जलसाठा या प्रमुख कारणांमुळे अखेरच्या घटकाला पाणीपुरवठा करताना व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसांऐवजी सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.

महान जलशुद्धीकरण केंद्रातील नादुरुस्त पंप, क्षतिग्रस्त जलवाहिन्या, जलकुंभांची अपुरी संख्या, वाढलेली लोकसंख्या या सर्व प्रकारामुळे दररोज पाणीपुरवठा करणे अशक्य झाल्याने नागरिकांना पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. यासाठीच प्रशासनाने शहराचे पाच भागात विभाजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

परंतु, आता उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने मागणी वाढली आहे. एकीकडे पाण्याची मागणी वाढली असताना तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पातून अधिक पाण्याची उचल करणे शक्य होत नाही. त्यामुळे झोन क्रमांक दोन तीन या भागांना पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. झोन क्रमांक दोन तीनमधील अनेक भागांना पाणीपुरवठा होत नाही, तर काही भागाला अत्यल्प पाणीपुरवठा होतो. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन्ही झोनमधून पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळेच यावर उपाय म्हणून पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. अद्याप या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात अथवा मेनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना एेन मे महिन्यात सहा दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो.
... तर पाणीपुरवठा होईल ठप्प :जलशुद्धीकरण केंद्रात तूर्तास पाच पंप सुरू आहेत. हे पाचही पंप दररोज सुरू ठेवल्यास आणि यापैकी एखादा अथवा दोन पंप नादुरुस्त झाल्यास शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे.

नवीन पंपांशिवाय पर्याय नाही :जलशुद्धीकरण केंद्रात नवीन पंप खरेदीसाठी राज्य शासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात महापालिकेला लोकवर्गणीचे १६ लाख रुपये द्यावे लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू आहे.

सहा दिवसांआडशिवाय पर्याय नाही
नागरिकांनासुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मागणी वाढल्याने अखेरच्या घटकाला पाणीपुरवठा होताना व्यत्यय येतो. त्यामुळे सहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे.'' सुनीलकाळे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

५.३० कोटी ली. पाण्याची उचल
महानजलशुद्धीकरणच्या नव्या केंद्रात तीन पंप सुरू असून, यापैकी दोन पंपांचा उपयोग केला जातो. तर जुन्या केंद्रात दोन पंप सुरू असून, यापैकी एका पंपाचा उपयोग केला जात आहे. उर्वरित दोन्ही पंप स्टँडबाय ठेवण्यात आले आहेत. या एकूण तीन पंपांच्या माध्यमातून प्रतितास २४ लाख लीटर पाण्याची उचल केली जाते. साधारणपणे हे पंप २० ते २२ तास सुरू असतात. त्यामुळे या वेळेत एकूण पाच कोटी ३० लाख लीटर पाण्याची उचल केली जाते.
झोन चे विभाजन करणार : पाचझोनपैकी झोन क्रमांक १, ४, मधील भागांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत नाहीत. परंतु, झोन क्रमांक या दोन्ही झोनमध्ये अनेक वसाहती आहेत.