आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालय कंत्राटी-बंधपत्रित परिचारिकांना तुटपुंजे वेतन, १० हजार रुपये मिळते मानधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या कायमस्वरूपी बंधपत्रित परिचारिकांच्या वेतनात कमालीची तफावत दिसत आहे. कायमस्वरूपी परिचारिकेला ३० हजार रुपये, तर कंत्राटी परिचारिकेला मात्र, १० हजार रुपये वेतन दिले जात असल्याने अशा परिचारिकांमध्ये आरोग्य प्रशासनाबद्दल असंतोष निर्माण झाला आहेे.

सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या काही वर्षांपासून बंधपत्रित कंत्राटी परिचारिकांच्या नियुक्त्या केल्या जात आहे. या परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. अकोला परिमंडळात अशा परिचारिका ३५० हून अधिक असून, राज्यात तीन हजारच्या जवळपास आहेत. आरोग्य कुटुंबकल्याण संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे हा दुजाभाव परिचारिकांच्या वेतनात दिसत असल्याचे वास्तव आहे. बंधपत्रित कालावधी संपल्यावरसुद्धा प्रत्येक उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून अर्थपूर्ण दृष्टिकोनातून ११ महिन्यांच्या ऑर्डरसाठी या परिचारिकांना त्रास दिल्या जात आहे. मात्र, नोकरी करावी लागत असल्याने कोणतीही परिचारिका समोर येऊन लेखी तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने अधिकाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या परिचारिकांवर मात्र, कमी वेतनाअभावी आर्थिक संकट कोसळले आहे.

आरोग्य मंत्र्यांकडे धाव
सार्वजनिकआरोग्य कुटुंबकल्याण संचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाला महिन्याकाठी कोटी ५० लाख रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस युवा विचार मंचचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष राजेश लाखे यांनी केला आहे. एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांना समान वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री दीपक सावंत यांच्याकडे त्यांनी याबाबत दाद मागितली आहे.

वेतन कुशल नियुक्ती
-बंधपत्रितकालावधी संपल्यानंतर परिचारिकांना पुन्हा ११ महिन्यांची करार नियुक्ती देऊ नये. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कुशल परिचारिकांची नियुक्ती करण्यात यावी.'' राजेशलाखे, विदर्भप्रदेश अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस युवा विचार मंच.

उत्साह झाला कमी
कंत्राटीपरिचारिकांनाही दरमहा हजार रुपये वेतन दिल्या जाते. त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या कायमस्वरूपी परिचारिकेला मात्र, ३५ ते ४० हजार रुपये वेतन आहे. अशी तफावत वेतनात दिली जात असल्याने या परिचारिकांचा काम करण्याचा उत्साह कमी झालेला िदसत आहे.