आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिष्ठातांकडून आश्वासनाचे मिळाले ‘चॉकलेट’, परिचारिकांचा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नामनिर्देशनाने शासनाने नियुक्त केलेल्या पदस्थापना असलेल्या परिचारिकांना त्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्यापासून वंचित ठेवून रुग्णसेवेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप करत परिचारिकांनी बुधवारी बंद पुकारला. अचानक पुकारलेल्या बंदमुळे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय सेवा प्रभावित झाली होती.
दुपारनंतर अधिष्ठातांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दि ल्यानंतर संप मागे घेण्यात आला.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबर रोजी अचानक बंद पुकारून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची गैरसोय झाली. अतिदक्षता विभागासह इतर एकाही वॉर्डात परिचारिकांनी पायही ठेवला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्णालय प्रशासनाने परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रुग्णांची देखभाल करताना दिसून आल्या. नर्सेस फेडरेशनने पूर्व सूचना देऊनही अधिष्ठाता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी परिचारिकांची कुठलीही व्यवस्था केली नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात होता. या आंदोलनात नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अरुणा वाघमारे, सचिव अंजली मेटकर, रश्मी तिवारी, श्रीमती चांदूरकर, सुनीता तेंडुलकर, राहुल नदे, सतीश कुरवाड, प्रमोद चिंचे, उमेश बघेल, अर्चना जोत यांच्यासह दोनशे परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या.

केरसुनीखराटाही नाही मिळत : वैद्यकीयमहाविद्यालय प्रशासनाकडून साफसफाई करण्याकरिता केरसुनी खराटा मिळावा, अशी मागणी केली आहे. लाखो रुपये खर्च करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे केरसुनी खराटा खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसा शिल्लक राहत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अधिष्ठातावादाच्या भोवऱ्यात : अधिष्ठाताडॉ. अशोक राठोड आले तेव्हापासून रुग्णालयात ते कोणत्या ना कोणत्या वादाने चर्चेत आहेत. अधिष्ठाता जर कर्तव्यदक्ष असतील, तर कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध करायला नको. मात्र, कर्मचारी परिचारिका विरोधात जाऊन आंदोलनाची भाषा बोलत आहेत.

न्याय मिळावा ही अपेक्षा
परिचारिकांनाकाम करताना विवि ध प्रश्न भेडसावतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सकारात्मक विचार करत प्रश्न मार्गी लावावे, ही अपेक्षा.'' अरुणावाघमारे, अध्यक्ष,नर्सेस फेडरेशन,

या आहेत मागण्या
*ज्येष्ठतायादीचा अपमान.
*बंद असलेल्या विभागामध्ये परिचारिकांची ड्युटी लावू नये.
*कक्षसेवक सफाई कामगार यांच्या कामाविषयी त्यांच्या सुपरवायझर सॅनेटरी इन्स्पेक्टरला जॉब विचारण्याविषयी तसेच कक्षसेवक आणि कामगार यांची संख्या, त्यांची यादी ते कोणत्या विभागात काम करतात, याची माहिती संघटनेला द्यावी.
*प्रत्येक विभागाचा डॉक्टरांनी सकाळी १० वाजता राउंड घेण्याबाबत.
*प्रत्येक कक्षात कर्मचाऱ्यांकरिता सिक रूम तयार करणेबाबत.
*पनियुक्तीनुसार काम द्यावे.
परिचारिकांनी बुधवारी अचानक बंद पुकारला. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय सेवा प्रभावित झाली होती.