अकोला- ‘होलिक्रॉस कॉन्व्हेंटमध्ये नर्सरीत अँडमिशनसाठी फोन करून चिठ्ठी देत एमपी (खासदार), एमएलए (आमदार), लोकप्रतिनिधी, बाबू, शाळेचे शिक्षक व इतर दलाल पैसे खातात. त्यामुळे ते पैसे शाळेला मिळत नाही. अशा राजकीय लोकांच्या चिठ्ठय़ा आणू नका. त्या आणल्यास शाळेत अँडमिशन होणार नाहीत,’ असा कडक इशारा होलिक्रॉस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युली यांनी 10 जून रोजी सकाळी दिला. मुख्याध्यापिका सिस्टर ज्युली यांच्या या जाहीर इशार्यामुळे मंगळवारी सकाळी शाळेत उपस्थित असलेल्या पालकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या शाळेत सकाळी मुलाच्या प्रवेशासाठी गेलेल्या एका पालकाने ही माहिती दिली.दरम्यान, होलिक्रॉस कॉन्व्हेंट नर्सरीत अँडमिशनसाठी यंदा 40 हजार रुपये मोजावे लागणार आहे.
शाळेच्या जवळ राहणार्यांना अँडमिशन : येथे गर्दी करू नका. या भागातील इतरही शाळांमध्ये प्रवेश घ्या, असा सल्ला सिस्टर ज्युली यांनी दिला. या शाळेत अँडमिशनसाठी 37 हजार 500 रुपये फी असून, त्यापैकी साडेसात हजार वार्षिक फी आहे. त्यामुळे इतर 30 हजार बिल्डिंग फंडच्या नावाने घेतले जातात. ज्यांना अँडमिशन दिली जाणार आहे, त्यांना एकरकमी पैसे भरावे लागतील.