आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या काय आहेत लठ्ठपणाचे धोके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ती मुलांची पिढी निरोगी निर्माण होण्याऐवजी दुर्धर आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. अलीकडच्या मुलांमधील गुटगुटीतपणा हा दृष्ट लागण्याचा विषय नसून, तो एका आजाराचे रूप धारण करीत आहे. 10 पैकी तीन मुले त्याचे बळी ठरत आहेत. आई-वडिलांचे धकाधकीचे जीवन, त्यामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, मैदानावर दिसणारी मुले सिमेंटच्या घरात बसून ‘जंगल-बुकात’ हरवून टीव्हीसमोर फास्टफूडचा आस्वाद घेण्यात रमल्यामुळे लठ्ठपणाच्या आजाराचा विळखा वाढत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. उर्वरित. 10 जून हा जागतिक लठ्ठपणा दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी लठ्ठपणाच्या कारणांविषयी जागृती केली जात आहे. अलीकडील पिढी ही लठ्ठपणाच्या आजाराने ग्रासली जात आहेत. त्याच्या विविध कारणांचा शोध, उपाय यावर चर्चा घडवली जात आहे. 10 मुलांमधून तीन मुले ही लठ्ठपणाच्या आजाराने त्रासलेली दिसत आहेत. काही ठिकाणी आनुवांशिक वाटत असला, तरी अनेकवेळा हा आजार चुकीच्या दिनचर्चेने आणि मुलांच्या भावनिक नात्यात अंतर पडल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडत आहेत.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...