आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Occasion Of Makarsankranti Police Notice To Kite Seller

चायना मांजा विक्रेत्यांना बजावल्या नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दरवर्षी मकरसंक्रांती सणाला होणाऱ्या पतंगबाजीमध्ये चायना मांजाचा वापर वाढत असून, त्यामुळे अनेक पक्षी, मनुष्य जखमी होण्याच्या घटना घडतात. निसर्गातील महत्त्वपूर्ण घटक असलेले हजारो पक्षी दरवर्षी मृत्युमुखी पडतात किंवा गंभीर क्षतिग्रस्त होतात. हे टाळण्यासाठी चायना मांजा विक्रीवर बंदी घालावी म्हणून दैनिक दिव्य मराठीने मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करून वन विभागाने आज, जानेवारीला शहरातील काही मांजा विक्रेत्यांना चायना मांजा विकण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत.

मकरसंक्रांतीला धारदार, टिकाऊ, स्वस्त असलेल्या चायना मांजाला वाढती पसंती वापरामुळे पक्ष्यांवरच संक्रांत आली आहे. केवळ नोव्हेंबर महिन्यात शहरात चार पक्षी या चायना मांजाने जखमी झाले होते, तर काही घटनांमध्ये माणसांनाही गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात वापरात आलेल्या या चायना मांजाचे मृत्यूचे सापळे आजही शहरात वृक्ष, विजेचे खांब, इमारती, घरांचे छत यावर कायम आहेत. पक्षी, मनुष्याला होणाऱ्या जीवघेण्या जखमांचा विचार करता चायना मांजावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासोबतच शहरात ठिकठिकाणी अडकलेला मांजा काढण्यासाठी मोहीम राबवण्याची गरज ‘दिव्य मराठी’ ने २६ नोव्हेंबरला मांडली होती. त्यानंतर सर्पमित्र शेख मुन्ना यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. सदर वृत्ताची दखल घेत आज वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विजय गोडबोले, वन विभागाचे उपवनसंरक्षक लोणकर यांच्या मार्गदर्शनात पथकाचे गठन करून ही कारवाई करण्यात आली. या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर, वनरक्षक पी. एल. लहामगे, एस. एच. चिरंगे, के. एम. ताकझुरे, आर. एस. जवंजाळ, एस. जे. राठोड आदींनी शहरातील महम्मद अली रोड, तेलीपुरा परिसरातील मुख्य पतंग, मांजा विक्रेत्यांना नोटीस बजावल्या. रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत कलम १४९ अन्वये या नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यानुसार चायना मांजाची विक्री करू नये केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे बजावले आहे. शहरातील गोल्डन पतंग सेंटर, गुलशन पतंग सेंटरसह प्रमुख व्यावसायिकांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

वृक्ष, खांबांवर मांजा
मागीलवर्षी जानेवारी महिन्यात वापरात आलेल्या या चायना मांजाचे मृत्यूचे सापळे आजही शहरात वृक्ष, विजेचे खांब, इमारती, घरांचे छत यावर कायम आहेत. अडकलेला मांजा काढण्यासाठी मोहीम राबवण्याची गरज