आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर, पातूरमध्ये एसटीवर दगडफेक, प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- फेसबुकवर महापुरुषांबद्दल अाक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ पातूर येथे साेमवारी दुपारी वाहनांवर दगडफेक करण्यात अाली. बाळापूरहून पातूरकडे येणाऱ्या एसटीच्या काचा फाेडल्याने तीन प्रवासी जखमी झाले. जिल्हा पाेलिस अधीक्षक चंद्र किशाेर मीणा, बाळापूर एसडीपीअाे गणेश गावडे यांच्या भेटीनंतर येथे तैनात केलेल्या अतिदक्षता पाेलिस पथकामुळे शहरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात अाहे.
पातूर येथील स्वप्निल सुरवाडे यांनी साेमवारी दुपारी पातूर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामध्ये हंसराज विश्वकर्मा शांतीलाल पांचाळ नामक व्यक्तींनी फेसबुकवर महापुरुषांबद्दल अाक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. यानंतर एका जमावाने बाळापूर मार्गावरील वसंतराव नाईक शाळा परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये बाळापूरहून पातूरकडे जाणाऱ्या एसटीचे पुढील मागील काचा फाेडण्यात अाल्या. यात एसटीतील १९ प्रवाशांपैकी तिघे जखमी झाले. त्यात एसटीचालक विलास श्रीधर बाळापुरे (वय ४२, रा. अकाेला), अहमदखान मुनीरखान (वय ६८) त्यांची मुलगी नाजमीनबी अहमदखान (वय २०) हे तिघे जखमी झाले. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली. भीतीने प्रवाशांनी एसटी साेडून पळत सुटले. मात्र, त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पातूरचे पाेलिस निरीक्षक वाघू खिल्लारे यांनी ताफ्यासह महामार्गावरील घटनास्थळ गाठले. जिल्हा पाेलिस अधीक्षक मीणा उपविभागीय पाेलिस अधिकारी गणेश गावडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पातूर गाठले. पाेलिसांचे अतिदक्षता पथकही येथे तैनात करण्यात अाल्याने परिस्थिती नियंत्रण अाहे. एसटीचालक विलास बाळापुरे यांनी पातूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्यातील अाकाश उपर्वट लखन पाेहरे या दाेघांना पाेलिसांनी अटक केली अाहे. फेसबुकवर महापुरुषांबद्दल अाक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.