आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी पुत्रावर पोलिस मेहरबान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कीर्तीनगरात राहणारे एकाच कुटुंबातील महिला व पुरुष रविवारी रात्री साडेदहा वाजता खदान पोलिस ठाण्यासमोरील एनसीसी कार्यालयासमोरून जात होते. तेवढय़ात प्रशांत राठोड या युवकाने तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकून पळ काढला. मात्र, त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, आरोपी एका पोलिस अधिकार्‍याचाच पोरगा निघाल्यामुळे त्याला सोमवारी सकाळी सोडूनही देण्यात आले.
तक्रार नसल्यामुळे कारवाई नाही
या घटनेत फिर्यादी समोर न आल्याने कारवाई करता येत नाही. कारवाई करण्यासाठी कुणीतरी तक्रार देणे आवश्यक आहे तसेच पकडण्यात आलेला संशयित हा चोरी करणार्‍याशी मिळता जुळता आहे. म्हणून त्याला पकडण्यात आले होते. तो विद्यार्थी असल्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा नाही
पोलिस स्वत:हून कारवाई करत नसतील तर गुन्हेगारांवर आळा कसा बसेल, असा प्रo्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करूनही पोलिसांनी या संशयित चोरट्यास रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.
पोलिस अधिकारी राठोडांचा तो मुलगा
सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले बाबूसिंग राठोड हे नंतर सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बुलडाण्यात बदलून गेले होते. सध्या ते पोलिस निरीक्षक म्हणून नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे सोमवारी दिवसभर खदान पोलिस ठाण्यात या मुलाचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली.