आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या निवासस्थानांमध्ये अधिकाऱ्यांचे वास्तव्य नाही, मुख्यालयी राहता अप-डाउन सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकीकडे निवासस्थान मिळण्यासाठी इतर विभागांतील अधिकारी प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे, एसटी महामंडळाचे अधिकारी आपल्यासाठीच्या निवासस्थानातील क्वॉर्टर्स रिक्त असतानाही सुखपयोगी भाड्याच्या आश्रय स्थानाचा पर्याय निवडतात. एवढेच नव्हे, तर मुख्यालयी राहता अपडाउनही सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
अकोला शहरामध्ये महामंडळाचे विभागीय कार्यालय, विभागीय वर्क शॉप आणि दोन आगार आहेत. त्यामध्ये अधिकारी वर्गासोबतच चालक, वाहक, कामगार, लिपिक इतर कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. या अधिकारी कर्मचारी वर्गासाठी निवासस्थानेही बांधण्यात आलेली आहेत. अकोला विभागीय कार्यालयालगत असलेल्या निवासस्थानामध्ये अधिकारी वर्गासाठी १२ क्वॉर्टर्स, तर कर्मचारी वर्गासाठी ९६ क्वॉर्टर्स आहेत. याशिवाय शहरातील मध्यवर्ती आगारामध्ये कर्मचाऱ्यांकरिता क्वॉर्टर्स, असे एकूण १०२ क्वाॅर्टर्स बांधण्यात आलेले आहेत.
एसटी दळणवळणाचे महत्त्वाचे माध्यम आहे. अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अकोला वाशीम जिल्ह्यातील कामकाज बघितल्या जाते. एसटीचा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आगार व्यवस्थापक यांना आगारामध्येच निवासस्थान बांधून दिली आहेत. शिवाय इतर सर्वच अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. काही अधिकारी कर्मचारी वर्गाचे स्वत:च्या मालकीच्या घरांमध्ये राहतात. मात्र, इतर अधिकारी कर्मचारीसुद्धा क्वाॅर्टर्समध्ये राहता सुखपयोगी जागा मिळत असल्याने भाड्याच्या घरामध्ये राहतात. परंतु, ते मुख्यालयी राहण्याचा नियम जरी पाळत असले, तरी घरभाडे भत्यापोटी मिळणारी भलीमोठी रक्कम त्यांच्या खिशात पडत आहे. यामुळे महामंडळाचेसुद्धा आर्थिक नुकसान होते.
कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या १०२ क्वॉर्टर्समध्ये कर्मचारी राहत आहे. मात्र, अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या १२ पैकी क्वॉर्टर्स त्यामध्ये कुणीच वास्तव्याला नसल्यामुळे रिकामे पडलेले आहेत. अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर असताना त्यांच्याकरिता बांधण्यात आलेल्या क्वॉर्टरची संख्या लक्षात घेता ती खूपच कमी आहे. मात्र, अशा परिस्थितीतही बांधण्यात आलेली क्वॉर्टर रिक्त राहतात. यामुळे महामंडळाच्या कामकाजावर निश्चितच परिणाम होत असल्याचे कुणीही नाकारून चालणार नाही. प्रवासी वर्गाला याचा विशेष तोटा होत नसला, तरी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या कामांवर परिणाम झालेला दिसून येतो. या प्रकारानेच कार्यरत कर्मचारी निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे वास्तव आहे.
चार वर्षांपासून क्वॉर्टर रिकामेच
अधिकारीवर्गासाठी असलेल्या निवासस्थानामधील क्वॉर्टर्स गेल्या वर्षांपासून रिकामे आहे. विशेष म्हणजे, हे निवासस्थान चांगल्या दर्जाचे आहे. तरीदेखील त्याचा उपयोग घेता आपल्या मर्जीप्रमाणेच महामंडळाचे अधिकारी वागत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
व्यवस्थापकाचे निवासस्थान मोडकळीस
अकोलाशहरातील मध्यवर्ती आगाराच्या आवारामध्ये आगार व्यवस्थापकांसाठी असलेले निवासस्थान इंग्रजांच्या राजवटीत बांधल्या गेले आहे. याला फार मोठा कालावधी लोटला असल्याने आता या निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. पूर्णपणे जीर्ण झालेल्या या इमारतीमध्ये वेळप्रसंगी जीवितहानी होण्याचा संभवही निर्माण झालेला आहे. त्याकरिता महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याची डागडुजी करण्याची गरज आहे.
अकाउंट अधिकाऱ्यांचे अपडाउन
विभागीयकार्यालयातील अंकेक्षण अधिकारीपदाचा दर्जा असलेले अकाउंट अधिकारी फैजपूरकर हे गेल्या तीन वर्षांपूर्वी रुजू झाले. त्यांनी महामंडळाच्या क्वॉर्टरचा लाभ घेतलेला नाही. विशेष बाब म्हणजे, ते अकोला मुख्यालयी राहता खामगाव येथून ये-जा करत आहेत. त्यामुळे महत्त्वपूर्ण कामकाज त्यांच्याकडे असल्याने कामे खोळंबत असल्याची ओरड कर्मचारी वर्गाकडून होत आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी काैलखेड परिसरात बांधण्यात आलेली ही निवासस्थाने निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली निवासस्थाने रिकामीच असूनही कर्मचाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहवे लागत आहे.
कामकाज वेळेची पूर्तता
पूर्वी अकोला येथील गायत्रीनगरात राहत होतो. मात्र, दरम्यान वडिलांचे आजारपण इतर कौटुंबिक अडचणींमुळे सध्या खामगाव येथे राहतो आहे. मात्र वेळेपूर्वीच कार्यालयात येणे आणि आपले कामकाज नियमानुसार पार पाडण्याचे काम पूर्ण करत आहे.
- फैजपूरकर, अकाउं' अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...