आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यामध्ये होणार 2005 पूर्वीच्या नोटांची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वीच्या नोटा 1 एप्रिलपासून चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 2005 पूर्वीच्या नोटा बँकेतून बदलण्याऐवजी त्या नोटांची सोन्यात गुंतवणूक करण्याकडे धनिष्ठांचा कल राहणार आहे, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नोटा बदलण्याच्या निर्णयाचा सोन्या-चांदीच्या दरावरही प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वर्ष 2005 च्या आधी छापलेल्या नोटा 1 एप्रिल 2014 नंतर चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला. त्यामुळे दडवलेल्या नोटा समोर येण्याचा कयास बांधण्यात येत आहे. 2005 अगोदर असंख्य नोटा छापल्या होत्या. आता त्या नोटांना चलनातून बाद करण्यात येणार आहे. 2005 अगोदर छापलेल्या नोटा 1 एप्रिल 2014 नंतर चलनातून बाद करून त्या परत घेण्यात येणार आहे, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. त्यामुळे ज्या नोटांवर छापण्याचे वर्ष दिलेले नाही किंवा 2005 वर्षाच्या आहेत, अशा नोटा परत घेतल्या जाणार आहेत.

सर्वसामान्यांपासून ते गर्भर्शीमंतांपर्यंत सर्वजण भविष्याची तरतूद म्हणून पैशाची साठवणूक करतात. वर्षांनुवष्रे साठवलेल्या नोटा तशाच कपाटात पडून राहतात. त्या नोटा बाहेर काढल्या जात नाही. आता रिझर्व्ह बँकेने नोटा बाद करण्याचा निर्णय घेतल्याने दडवलेल्या नोटा बाहेर येणार आहेत. 2005 अगोदरच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याने काळा पैसादेखील बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोल्यात र्शीमंतांची संख्या मोठी आहे. त्याच प्रमाणे त्यांच्याकडे पैशांची साठवणूकही मोठी असल्याची माहिती आहे.

मार्च ‘एन्डिंग’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने 2005 अगोदरच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करून अनेकांना धक्का दिला. जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत आणल्यास त्या नोटा ‘ऑन रेकॉर्ड’ होतील. त्यामुळे हे पैसे ‘ऑन रेकॉर्ड’ न आणण्यासाठी विविध मार्ग शोधण्यात येत आहे. त्यामुळे 2005 अगोदरच्या नोटा सोन्या-चांदीत गुंतवणुकीला पसंती आहे, अशी माहिती आहे. परिणामी, मागील काही दिवसांत सोन्याचे व चांदीचे भावदेखील वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सध्या सोन्याचे भाव 29 ते 30 हजारांच्या घरात आहे. त्यामध्ये एक ते दोन हजाराने वाढ होऊ शकते. अकोला शहर ‘गोल्ड मार्केट’साठीदेखील प्रसिद्ध असल्याने या निर्णयाने सोन्याच्या मार्केटमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.