आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Note Of 2005 Can Get Change In Banks, Reserve Bank Decision

जुन्या नोटांचा पडणार पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वर्ष 2005 च्या आधी छापलेल्या नोटा 1 एप्रिल 2014 पासून परत मागवण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे दडवून ठेवलेल्या नोटा समोर येऊन जुन्या नोटांचा पाऊस पडेल, असा विश्वास अकोल्यातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जुन्या नोटा बदलून देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. 2005 अगोदर असंख्य नोटा छापल्या होत्या. आता त्या नोटा हळूहळू चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांपासून ते गर्भर्शीमंतांपर्यंत सर्व जण भविष्याची तरतूद म्हणून पैशाची बचत करतात. वर्षानुवष्रे बचत केलेल्या नोटा तशाच कपाटात पडून राहतात. त्या नोटा बाहेर काढल्या जात नाही. रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयामुळे दडवून ठेवलेल्या नोटा मोठय़ा प्रमाणात बाहेर येणार आहेत. त्यामुळे अकोल्यात नोटा बदलण्यासाठी जुन्या नोटांचा पाऊस पडू शकतो, अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली.

काळा पैसादेखील मोठय़ा प्रमाणात बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोल्यात र्शीमंतांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पैशांची बचतही मोठी आहे, अशी माहिती आहे.

बँकांना द्यावी लागेल नोटा बदलण्याची सुविधा
बँकांशी संपर्क करून नागरिकांना या नोटा परत कराव्या लागणार आहे. ज्या नोटांवर छपाईचे वर्ष नमूद केलेले नसतील त्या नोटा परत कराव्या लागणार आहे. प्रमुख बँकांना 2005 पूर्वीच्या नोटा परत कराव्या लागणार आहेत. ज्या नोटांवर छपाईचे वर्ष नमूद नसेल अशा नोटा परत कराव्या लागणार आहेत. प्रमुख बँकांना या नोटा परत करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल.

एकच्या नोटांचा झाला होता गोंधळ
एक रुपयाची नोट चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर ती बदलून घेण्यासाठी गोंधळ झाला होता. या प्रकारे निर्णय जाहीर झाल्यावर नागरिकांनी नोट बदलून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. आता 10 रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या 2005 अगोदरच्या सर्व नोटा बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यात घाबरून जाण्यासारखे काही नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

साठवलेला पैसा समोर येईल
42005 पूर्वीच्या नोटा परत मागवण्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचा आदेश अद्याप प्राप्त झाला नाही. तो आदेश प्राप्त होताच नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. या निर्णयामुळे साठवलेला पैसा बाहेर येईल. राजन सोनटक्के, व्यवस्थापक, स्टेट बँक.