आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Women Hunger Strike On Collector Office, Divya Marathi

वृद्ध महिलेचे जिल्हाकचेरी समोर उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पातूर तालुक्यातील पिंपळडोली येथील वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीसंदर्भातील निकाल कोर्टाने आपल्या बाजूने देऊनही अतिक्रमण केलेला व्यक्ती शेत जमिनीचा ताबा सोडत नाही. प्रशासनाने शेत जमीन ताब्यात मिळवून द्यावी, या मागणीसाठी बाळापूर येथील रहिवासी कुसुमबाई जाधव (वय 55) या बुधवारपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीवर चौंढी येथील व्यक्तीने ताबा मिळवला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, अकोला, तहसीलदार, पातूर, आयुक्त अमरावती, नागपूर बेंच उच्च न्यायालय, वि. तहसीलदार, बाहापूर, उपविभागीय अधिकारी बाळापूर आदींचा निकाल आपल्या बाजूने लागला आहे. गैर अर्जदार दीपक जैन यांना शेत जमिनीवरील ताबा काढून घेण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही अद्याप जमिनीवर ताबा मिळाला नाही. जमीन मिळवण्यासाठी सात लाख रुपये खर्च झाले असून, आर्थिक स्थिती खालावल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. जमिनीसह सात लाख रुपयेही मिळवून द्यावेत, अशीही मागणी कुसुमबाईने केली असून, मागण्या पुर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.