आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Akola National Highway Truck Truck Accident Number Six On The People Are Dearh

भीषण अपघातात चालक जागीच ठार, ओव्हरटेकच्या नादात दोन्ही ट्रकची जबर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रीयमहामार्ग क्रमांक सहावर बाभुळगावनजीक शुक्रवारी, सकाळी ११.३० च्या दरम्यान दोन ट्रक आमनेसामने एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकचा चालक पारसपुरी खानापुरी रा. देवळी ता. रायपूर जि. पाली (राजस्थान) जागीच ठार झाला तर बालाजी ट्रान्सपोर्टचा ट्रकचालक त्याचा सोबती हे दोघेही गंभीर जखमी झाले.

बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम.एच. २० ए.टी. ७१४४ क्रमांकाचा ट्रक हा औषधी जनरल साहित्य घेऊन शुक्रवारी सकाळी अकोल्याकडे निघाला. दरम्यान, ट्रकचालक दिनेश उर्फ भानुदास ठाकूर रा. कैलासटेकडी (वय ३५ वर्ष) बाभुळगाव येथील धाब्यावर काही काळ थांबून पुन्हा अकोल्याच्या दिशेने निघाला. तर या ट्रकच्या विरुद्ध दिशेने जी.जे. ०९ ए.व्ही. ३३२० क्रमांकाचा ट्रक सल्फर लेस शुगर गुजरातहून नागपूरकडे घेऊन जात होता. ओव्हरटेकच्या नादात दोन्ही ट्रकची जबर धडक झाली. नागपूरकडे जाणारा जी.जे.०९ ए.व्ही. ३३२० क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन झाडाला आदळला. ट्रकचा चालक भानुप्रताप ठाकूर याचे दोन्ही पाय स्टेअरिंगमध्ये अडकल्याने निकामी झाले. ट्रकचालकासोबतच त्याचा साथीदारदेखील गंभीर जखमी झाला असून, दोघांना सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे ठाणेदार, पोलिस निरीक्षक सावकार, संजयकुमार मिश्रा, वाहतूक शाखेचे शिवा ठाकूर घटनास्थळी पोहोचले घटनेचा पंचनामा केला. सिव्हिल लाइन्स पोलिस घटनास्थळाचा उशिरापर्यंत पंचनामा करत होते.
ग्निशमन दल वेळेवर पोहोचले
घटनेचीमाहिती मिळताच अग्निशमन विभागाची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाने वेळेतच आग विझवून नियंत्रणात आणली. तर दोन्ही ट्रकचा काही क्षतिग्रस्त भाग महामार्गावर पडला होता. अग्निशमन विभागाच्या वतीने रस्तादेखील साफ करण्यात आला. त्यामुळे इतर वाहनांसाठी रस्ता मोकळा झाला.
तास-दीड तास वाहतूक ठप्प
दोन्हीबाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांची रांग नवोदय विद्यालयापर्यंत तर अकोल्याकडे येणाऱ्या वाहनांची रांग बरीच लांब असल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक शाखेचे शिवा ठाकूर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तासाभरानंतर वाहतूक पूर्ववत झाली.