आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा खाणार एप्रिल महिन्यामध्ये ‘भाव’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एप्रिल महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात काद्यांला प्रती क्विंटल हजार ५०० ते हजार ६०० रुपये भाव मिळू शकतो, असा अंदाज येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (पीकेव्ही) कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी विभाग आणि राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र धोरण संशोधन केंद्राने (एनसीएपी) व्यक्त केला. तसे झाल्यास खुला कांदा ३० ते ३५ रुपये किलो रुपयांपर्यंत जाईल. पीकेव्ही आणि एनसीएपी यांनी मागील ११ वर्षांत काद्यांचे झालेले उत्पन्न आणि किमतीचा कल याचा अभ्यास केला. त्यानुसार बाजारपेठेत सध्या असलेली स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात, वेगवेगळ्या प्रतीनुसार एप्रिल महिन्यात येणा-या काद्याला प्रती क्विंटल हजार ५०० ते हजार ६०० रुपये भाव मिळेल. दरम्यान, शासनाने आयात, निर्यात धोरण बदलले किंवा वातावरणात अचानक बदल झाला, तर त्याचा परिणाम काद्यांच्या किमतीवर होऊ शकतो, असा अंदाजसुद्धा त्यांनी केला.

कांदा उत्पादनात भारत दुसरा
जगातीलएकूण कांदा उत्पन्नाच्या क्षेत्रापैकी १६.८२ टक्के उत्पन्न भारतात होते. जागतिक क्रमवारीत हा दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक चीनचा असून, त्यांची टक्केवारी २७ आहे. भारतातील कांद्याला मलेशिया, बांग्लादेश, युनायटेड अरब अमिरात, श्रीलंका, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि नेपाळ या देशात मागणी आहे. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, वर्ष २०१३-१४ मध्ये देशातील एकूण कांद्यापैकी ३० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्राचा होता.
रब्बी काद्यांच्या जाती : एन २-४-१, पुसा रेड, अर्का निकेतन, अॅग्रीफाऊंड लाइट रेड, एन - २५७ -९१, अॅग्रीफाऊंड व्हाइट, फुले सफेद, फुले सुवर्णा.